शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

त्यांच्या इच्छेमुळे मिळाले तिघांना जीवनदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:29 PM

अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत व मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.

ठळक मुद्दे यकृत, दोन्ही मूत्रपिंडाचे दान : वर्धेच्या सावरबांधे कुटुंबीयांचा पुढाकार

 लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धा, देवळी येथील रहिवासी अशोक सावरबांधे (५२) ‘बे्रन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच सावरबांधे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या स्थितीतही संयम दाखवित त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत व मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळाले.प्राप्त माहितीनुसार, आजारी बहीण पुष्पा कामडी यांची विचारपूस करण्यासाठी ५ डिसेंबर रोजी अशोक सावरबांधे सेवाग्राम येथे जात होते. याच दरम्यान वर्धा येथील दयाळ चौकजवळ त्यांची बाईक मोकाट जनावराला धडकली. जखमी अवस्थेत त्यांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु सुधारणा होत नसल्याचे पाहत नागपूर लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना स्थानांतरित केले. डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतु शनिवारी सकाळी ७.१० वाजता डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) घोषित केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चमूने त्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मुलाग सूरज सावरबांधे यांनी यात पुढाकार घेत वडिलांचीही इच्छा अवयवदानाची होती असे सांगून सहमती दर्शवली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी व ‘रिट्रायव्हल अ‍ॅण्ड ट्रान्सप्लँटेशन कॉआॅर्डीनेटर’ वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.आतापर्यंत २९ यकृताचे प्रत्यारोपण‘झेडटीसीसी’ स्थापन झाल्यानंतर २०१३ ते आतापर्यंत ४२ ‘ब्रेन डेड’ दात्यांची नोंद झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत २९ यकृताचे प्रत्यारोपण झाले. यातील एकट्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये १४ यकृत प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले. हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, हृदयरोग विशेषज्ञ डॉ. आनंद संचेती, कार्डियोलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. साहिल बंसल यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.७६वे मूत्रपिंड प्रत्यारोपणगेल्या पाच वर्षांत ब्रेन डेड दात्यांकडून आतापर्यंत ७६ मूत्रपिंड मिळाले. यात सावरबांधे यांच्या दोन मूत्रपिंडापैकी एक न्यू इरा हॉस्पिटल तर दुसरे वोक्हार्ट हॉस्पिटलला देण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. प्रकाश खेतान, युरो सर्जन डॉ. रवी देशमुख, डॉ. साहिल बन्सल व सविता जयस्वाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर