शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

बहुचर्चित अक्कू यादव खून खटल्याचा निकाल सोमवारी

By admin | Updated: November 6, 2014 02:45 IST

देशभरातील लोकांच्या नजरा लागून असलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कुख्यात अक्कू यादव खून खटल्याचा ..

नागपूर : देशभरातील लोकांच्या नजरा लागून असलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कुख्यात अक्कू यादव खून खटल्याचा निकाल सोमवारी १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात चालला. जमावाकडून खात्मा१३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर जमावाने अक्कूचे घर जाळून टाकले होते. सामान्यांना धरले होते वेठीसकस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून गुंडागर्दी करायचा. गुंडगिरी करून दहशत माजवल्याने अक्कूला ७ आॅगस्ट २००४ रोजी अटक करून, दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु त्याचा एक साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडल्या गेल्याने त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्याला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती. आठ वर्षे धूळ खात होते प्रकरणतदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. दुनेदार यांच्या न्यायालयात या खटल्यास प्रारंभ झाला होता. त्यांच्या न्यायालयात २२ आॅक्टोबर २०१२ रोजी पहिला साक्षीदार तपासण्यात आला. पुढे त्यांची बदली झाल्याने हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाकडे आला. त्यांच्या न्यायालयात अखेरचा साक्षीदार ३० सप्टेंबर २०१४ रोजी तपासण्यात आला. या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. ७ डिसेंबर २००४ ते आॅक्टोबर २०१२ पर्यंत तब्बल आठ वर्षे हे प्रकरण धूळ खात पडून होते. न्यायव्यवस्थेवर हल्लाआज अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी न्यायालयात आपला लिखित युक्तिवाद सादर केला. लोक ज्या न्यायालयात न्याय मागण्यास येतात त्याच पवित्र न्यायमंदिरात खून करण्यात आला. न्यायव्यवस्थेवर हा हल्ला होय. न्यायव्यवस्थेत भीती निर्माण झाली पाहिजे, असा आरोपींचा हेतू दिसत आहे. अशा स्थितीत आरोपींना सोडता येईल काय, आरोपींना सोडल्यास जनतेचा न्यायावरील विश्वास संपुष्टात येईल. आरोपींना साक्षीदारांनी पाहिले आहे. ओळख परेड आणि न्यायालयातही त्यांना ओळखले आहे. यावरून त्यांच्या साक्षीवर अविश्वास व्यक्त करता येणार नाही. न्यायालयाच्या तुटलेल्या दारातून आतमधील दिसते, त्यामुळे आतमधील दृश्य दिसत नाही, असे बचाव पक्षाचे म्हणणे योग्य नाही, असेही सरकार पक्षाने आपल्या युक्तिवादात नमूद केले. या खटल्यात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.के. तिवारी आणि अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले. ‘हमे उसको खतम करना है’१३ आॅगस्ट रोजी अक्कू याला पोलीस कर्मचारी दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था त्याच्या दिशेने धावला होता.‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, असे हा जमाव म्हणत होता. अक्कूला पोलिसांनी दगडी इमारतीच्या आत नेऊन चॅनल गेट बंद केले होते. त्याला न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने त्याला दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमावाने लाकडी दार तोडून न्यायालयात घुसून त्याचा खून केला होता.केवळ १८ आरोपीया प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या १२० (ब), १२१ (अ), १४३, १४७, १४८, ३४९, ३०२, ३५३, ३३२, ३२६, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. त्यात सात महिलांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबनराव पोराटे यांनी करून, न्यायालयात ७ डिसेंबर २००४ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला सुरू असताना अजय मोहोड, देवांगणा हुमणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे तूर्त या खटल्यात केवळ १८ आरोपी आहेत. (प्रतिनिधी)