नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 09:22 PM2021-06-12T21:22:28+5:302021-06-12T21:23:08+5:30

Restrictions in Nagpur district maintained राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्हा अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहे.

Restrictions in Nagpur district maintained: Collector | नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम : जिल्हाधिकारी 

नागपूर जिल्ह्यातील निर्बंध कायम : जिल्हाधिकारी 

Next
ठळक मुद्देजिल्हा पहिल्या श्रेणीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्हा अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहे. कोरोना अद्याप संपला नसून नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

            तथापि, काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात लागू असलेल्या बाबींना १४ जूनपासून सकाळी ७ वाजेपासून ते पुढील आदेशापर्यत मुभा देण्यात येत आहे.

            यामध्ये आधार कार्ड सेंटर (सायंकाळी ५ वाजेपर्यत),टायपिंग इन्स्टिट्यूट,कॉम्युटर इन्स्टिट्यूट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास इन्स्टिट्यूट (एकावेळी २० विद्यार्थी किंवा क्षमतेपेक्षा ५० टक्क्यापेक्षा कमी उपस्थितीत देता येणार प्रशिक्षण) शॉपिग मॉलमधील रेस्टाँरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यत मुभा, मॉलमधील बार मात्र सायंकाळी ५ पर्यतच सुरू राहतील. इनडोअर गेमलाही सायंकाळी ५ वाजेपर्यत परवानगी राहील. हे आदेश सोमवार १४ जून सकाळी ७ वाजतापासून तर २१ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यत लागू राहतील. वरील बाबी वगळता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी ६ जून रोजी काढलेल्या आदेशातील निर्बंध कायम ठेवले आहेत.

६ जूनच्या आदेशामध्ये नमूद पुढील आदेश कायम असतील

- आवश्यक वस्तूंच्या दुकानाची आस्थापनांची वेळ ५ वाजेपर्यंत राहील.

-आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकानांची आस्थापनांची वेळ ५ वाजेपर्यंत राहील.

- शहरातील मॉल, चित्रपट गृह, मल्टिप्लेक्स नाट्यगृह, ५० टक्के क्षमतेमध्ये फक्त ५ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.

- उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेत रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येतील.

- लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.

- सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वाॅकिंग, सायकलिंगसाठी सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते ९ परवानगी आहे.

- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता १०० व्यक्ती पर्यंत मर्यादित.

- लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या ५० टक्के उपस्थिती क्षमतेत करता येईल. मात्र ही पन्नास टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत शंभर लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.

- अंत्यसंस्कार अधिकाधिक ५० लोकांना उपस्थित राहता येईल.

- बांधकाम करण्यास परवानगी आहे.- कृषी, शेतीच्या सर्व कामांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी आहे.

- शाळा कॉलेजेस, सर्व धार्मिक स्थळे, सर्व जलतरण तलाव बंद असतील.

Web Title: Restrictions in Nagpur district maintained: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.