लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रामटेक शहरातील शाळेत जाण्यास व शाळेतून घरी परत येण्यास बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत असल्याने, घाेटी-देवलापार ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. दुसरीकडे बसेसची कमतरता असल्याचे रामटेक येथील आगार प्रमुखांनी दिले.
देवलापार, बाेरडा (सराखा)सह परिसरातील अनेक गावांमधील शेकडाे विद्यार्थी रामटेक शहरातील शाळा, महाविद्यालयात शिकतात. हे विद्यार्थी, विद्यार्थिनी राेज बसने ये-जा करायचे. काेराेना संक्रमणामुळे शाळांसाेबत बससेवाही बंद करण्यात आली हाेती. संक्रमण कमी हाेताच शाळा, महाविद्यालये १५ डिसेंबर, २०२० पासून व काही प्रमाणात बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील बससेवाही अजूनही बंदच आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आधी मनसरपर्यंत व नंतर दुसऱ्या बस अथवा वाहनाने रामटेकला यावे लागते, तसेच याच पद्धतीने घरी परत जावे लागते.
या विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी ८ ते ११.३० ही आहे. या विद्यार्थ्यांना मनसरहून सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर बस मिळते. त्यामुळे त्यांना शाळेत पाेहाेचण्यास राेज किमान एक ते दीड तास उशीर हाेत असल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते. विद्यार्थ्यांना पहिल्या व प्रसंगी दुसऱ्या तासिकेला मुकावे लागते. काेराेना संक्रमणापूर्वी सकाळी ७.३० वाजताची घाेटी-रामटेक व दुपारी १२.३० वाजताची रामटेक-देवलापार ही बससेवा सुरू असल्याने ती विद्यार्थ्यांच्या साेयीची हाेती. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीही विद्यार्थ्यांसह पालक व एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
...
बसेसची कमतरता
विद्यार्थ्यांची ही समस्या निश्चितच साेडविली जाणार असून, त्याला थाेडा वेळ लागणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली. त्यासाठी काही बसेस ॲडजेस्ट कराव्या लागणार आहेत. रामटेक आगारात पूर्वी ५६ बसेस हाेत्या. यातील नऊ बसेस स्क्रॅप झाल्या असून, पाच बसेस कन्व्हर्षण झाल्या आहेत. त्यामुळे आगारात सध्या ४४ बसेस आहेत, अशी माहिती आगारप्रमुखांनी दिली. विशेष म्हणजे, रामटेक तालुक्यात मानव विकास उपक्रम लागू असतानाही विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. आगारात उपलब्ध असलेल्या बसेस केवळ प्रवाशांसाठीच वापरल्या जात आहेत. ही समस्या साेडविण्यासाठी यापूर्वी तीन गावांमधील विद्यार्थ्यांसह पालकांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.