शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी महापौरांवर अन् अधिकार शून्य : विश्वनाथ महाडेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:43 IST

महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.

ठळक मुद्देआर्थिक व प्रशासकीय अधिकारात वाढ व्हावीमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका  क्षेत्रात समस्या उद्भवली तर महापौरांना जबाबदार धरले जाते. परंतु अधिकाराची मागणी करूनही सरकारकडून मिळत नाही. जबाबदारीचा विचार करता महापौरांना आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे अधिकार द्यावे, महापौरांच्या अधिकारात वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे, अशी भूमिका महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मांडली.महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्यावतीने १८ व्या महापौर परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती), नागपूर येथे करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनानंतर महाडेश्वर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परिषदेच्या उपाध्यक्ष महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. महाडेश्वर म्हणाले, सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर क रून तो अभिप्रायासाठी राज्य सरकारकडे पाठविला तर त्यावर ५ ते १० वर्षे कुठल्याची प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. प्रस्तावाचे महत्त्व संपून जाते.आयुक्तांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. दुसरीकडे अधिकार नसलेल्या नगरसेवकांना व महापौरांना नागरिकांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता अधिकारात वाढ करण्याची गरज आहे. परिषदेच्या माध्यमातून एखाद्या शहरातील चांगला प्रकल्प अन्य शहरात राबविला जावा, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, विकास कार्यावर चर्चा व्हावी. यात येणाऱ्या अडचणी शासनापुढे मांडल्या जाव्यात. ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नाही. महापौरांनाही विश्वासात घेतले जात नाही. अशा प्रश्नाना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.

आर्थिक मदतीत वाढ करावीशहरांचा विस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. मदत वाढवून शहराच्या विकासाला गती मिळू शकते.

शिवसेनेचा विकासाला विरोध नाहीशिवसेनेचा कोणत्याही विकास कामांना विरोध नााही. मुंबईत मेट्रो रेल्वेमुळे एक हजार झाडे कापली जात आहेत. त्या मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी झाडे लागली पाहिजेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचा वाटा उचलणे महापालिकांना शक्य होत नाही. याचा विचार करता विकास योजनेत सरकारचा वाटा वाढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विश्वनात महाडेश्वर यांनी स्मार्ट सिटी व मेट्रो रेल्वे संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केलेले मुद्दे

  • सामाजिक समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापौरांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार मिळावे. काही राज्यात महापौरांना असे अधिकार आहेत.
  • आपत्ती वा तातडीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  • महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचा अधिकार महापौरांना असावा.
  •  एका वित्त वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरांना ७ कोटी तर अन्य महापालिकांच्या महापौरांना २.५० कोटींचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. यात वाढ करून बृहन्मुंबई महापौरांना २० कोटी तर अन्य महापौरांना १० कोटी करण्यात यावे.
  • आयुक्तांकडून स्थायी समिती अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना देण्यात येणाऱ्या प्रस्तावांची प्रत महापौरांनाही मिळावी.
  • महापालिका सभागृहाचा कोणताही निर्णय रद्द करण्यापूर्वी शासनाने महापालिकेची बाजू जाणून घ्यावी.
  • महिला उद्योग भवनासाठी जागा आरक्षित करावी, यासाठी १०० टक्के अनुदान मिळावे.
  • नगर विकास दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. या दिनानिमित्ताने चांगले काम करणाऱ्या नगर परिषदांना शासनाकडून दरवर्षी ७८ कोटींचा निधी दिला जातो. त्याच धर्तीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या  महापालिकांनाही हा निर्णय लागू करावा.
  • महापालिका शासनाकडे विविध प्रस्ताव पाठवितात. त्यावर ठराविक मुदतीत निर्णय व्हावा.
  •  महापौराच्या आतिथ्य भत्त्यात वाढ करण्यात यावी.
  • आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार महापौरांना मिळावे.
  •  आमदार-खासदार यांच्या धर्तीवर महापौरांनाही प्रोत्साहन निधी मिळावा.
टॅग्स :MayorमहापौरMaharashtraमहाराष्ट्र