शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कलावंतांची जबाबदारी पूर्णत: राज्यशासनाची : प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:30 IST

नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अशी भावना ज्येष्ठ नाटककार व ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.कलावंत जगला पाहिजे, त्यासाठी काय करावे?कलावंत रसिकांच्या मनोरंजनाची आणि विद्वत्तेची भूक भागवतो. मात्र, असे करताना त्याच्या खिशात दीड दमडीही राहत नाही. तो जगेल तरच कला जिवंत राहतील. म्हणून, प्रत्येक कलावंताला शासनाकडून एक घर मिळायला हवे, तो घर चालवू शकत असेल तरच कलेसाठी वेळ देऊ शकतो म्हणून, त्याच्या खात्यात दहा लाख ठेवीस्वरूपात शासनानेच ठेवायला हवे आणि त्याच्या व्याजातून तो घर चालवू शकेल. त्याला त्याच्या प्रत्येक संशोधन कार्यात वा कलाविष्कारासाठी फेलोशिप मिळायला हवी.नाट्य परिषदेच्या कामावर संतुष्ट आहात का?बिल्कूल नाही.. नाट्य परिषद काम करीत नाही, ही तक्रार माझी स्वत:ची आहे. आज परिषदेच्या ६२ शाखा बृहन्महाराष्ट्रात आहेत. मात्र, अनेक शाखा बंद पडल्या आहेत. मध्यवर्तीने विविध उपक्रमांसाठी परिषदेच्या शाखांना निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र, नाट्य परिषदेला सरकारकडून किती अनुदान मिळते, याबाबत कुणालाच काही सांगता येत नाही. तेव्हा शासनानेही याकडे लक्ष पुरवावे.नाट्य लेखिकांची संख्या कशी वाढेल?नाटक वगळता साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात महिला लेखिका पुढे येत असल्याचे दिसून येते. यावरून नाटकासाठीच्या चिंतनाबाबत महिला कुठेतरी कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी कार्यशाळा घेत आहोत. नागपुरात महिला लेखिकांची कार्यशाळा आयोजित केली जाते, महिला नाट्य महोत्सव घेतले जातात. मात्र, त्याचा प्रभाव पुणे-मुंबईकडे पडायला हवा... तसे होत नाही. त्याअनुषंगाने महिला नाट्य लेखिकांच्या अभिव्यक्तीला चिंतनाची धार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, त्याबाबत...नाट्य संस्थांकडून उपक्रम होत नाही, ही बाब खरी आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवे. त्यासाठी नाट्य परिषदेच्या शाखांनी पुढाकार घ्यावा आणि नाट्य संस्था शासनदरबारी नोंदणीकृत होतील, याचे प्रयत्न करावे. उपक्रमांसाठी प्रत्येक नोंदणीकृत नाट्य संस्थेला विशेष तरतुदीअंतर्गत दरसाल ५० हजार रुपये अनुदान द्यावे आणि उपक्रमांचा आराखडा सादर करण्यास बाध्य करावे. तर आपोआप नाट्य संस्थांना उभारी मिळेल. शेवटी कलावंतांना पैसा लागतो आणि त्याशिवाय कोणतेच उपक्रम होत नाही, हे सत्य आहे.अध्यक्ष या नात्याने कोणते प्रयत्न सुरू आहेत?संमेलनाध्यक्ष असल्यापासून पुणे, एरोली, नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर येथे नाट्यलेखन कार्यशाळा घेतल्या आहेत. नागपुरात ही सहावी कार्यशाळा आहे. मात्र, त्यासाठीचा निधी अपुरा पडतो. मला अध्यक्ष या नात्याने मिळालेल्या निधीतून ते शक्य नाही, तरीदेखील स्थानिक शाखांच्या मदतीने घेतो आहे.

 

टॅग्स :Natakनाटकinterviewमुलाखत