शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या ८५ रस्त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:44 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहणार आहे.जिल्ह्यातील हिंगणा, उमरेड, कुही, मौदा, नागपूर (ग्रा.), कामठी व भिवापूर या तालुक्यांतील तब्बल ४८८ वर किमीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांना दर्जोन्नती देऊन त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग घोषित करण्यात आले आहे. यात हिंगणा तालुक्यातील आठ इतर जिल्हा मार्ग व पाच ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील १७ इतर जिल्हा मार्ग व १८ ग्रामीण मार्गांचा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून समावेश करण्यात आला आहे. नागपूर (ग्रा.) तालुक्यातील ३ इतर जिल्हा मार्ग व ११ ग्रामीण मार्ग, मौदा तालुक्यातील ४ इतर जिल्हा मार्ग व ४ ग्रामीण मार्ग तसेच कामठी तालुक्यातील ३ इतर जिल्हा मार्ग तसेच १२ ग्रामीण मार्ग अशा एकूण ८८ मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झाले आहे. आजवर या सर्व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे होती. मात्र आता या मार्गांना दर्जोन्नती प्राप्त झाल्यामुळे याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द झाली आहे. यामुळे जि.प.च्या अखत्यारित येणारे सध्या रखडलेल्या परिस्थितीत असलेल्या पांदण रस्त्यांत सुधार होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर