शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलण्यापेक्षा समोरच्याची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 11:26 IST

मकरसंक्रांतीचा गोडवा आयुष्यात बाणण्यासाठी काय करायला हवे हे, लोकमतच्या गुडबोला.. गोड बोला या सदरात सांगत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रत्येकाशी चांगले बोलावे, गोड बोलावे असे नेहमीच सांगितले जाते. ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, तेव्हा त्याच्याशी खूप गोड बोलूनही त्याची समस्या सुटत नसेल तर त्याचा काय फायदा? याऐवजी त्या व्यक्तीची समस्या सोडविणे आवश्यक आहे. त्याची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटते.झ्याकडे अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे? ते नीट समजून ती सोडवण्याचा प्रयत्न मी करतो. समोरच्या व्यक्तीची समस्या सुटेल, असा सल्ला त्याला देतो. माझ्या दृष्टीने माझ्याकडे समस्या घेऊन येणाºया व्यक्तीची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.जिल्हाधिकारी असल्याने दररोज शेकडो लोक भेटायला येतात. आपण सर्वांसोबतच सामान्यपणे चांगलेच बोलत असतो. भेटायला येणारे नागरिक हे आपापल्या अडचणी घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्याशी नुसतेच गोड बोलून कसे होणार? त्यांची समस्याही सुटायला हवी ना. समस्या सुटत नसेल आणि केवळ गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल तर त्या गोड बोलण्यालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे माझा नेहमीच असा प्रयत्न राहतो की, समोरची व्यक्ती ही पूर्ण समाधानी व्हावी. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे. समजावून सांगणे आवश्यक आहे.आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत, तसे त्याला समजावूनही सांगा. म्हणजे त्यालाही फार बरे वाटेल. गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट