शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मोटार वाहन विधेयकाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:45 IST

केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ठळक मुद्देआॅटोचालकांनी केली निदर्शने : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटओ) नागपूर शहरसमोर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेकडो आॅटोचालकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात नारे-निदर्शने केली. यावेळी भालेकर म्हणाले, केंद्राच्या होऊ घातलेला नवा मोटार वाहन कायदा हा आॅटोरिक्षा व्यवसायाच्या विरोधात आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. आॅटोरिक्षा चालकांच्या जीवावर उठलेले ओला, उबर व ई-रिक्षा बंद करण्याचीही आमची मागणी आहे. या शिवाय, वाढलेल्या विम्याचे दर कमी करण्याची, नागपूर रेल्वे स्थानकावर ओला कॅबचे पार्किंग रद्द करण्याची व नागपुरात सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक बंद करण्याची मागणी आहे. या मागण्याचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे यांना देण्यात आले. त्यांच्या मार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, परिवहन मंत्री यांच्यापर्यंत पोहचविले जाणार आहे. फेडरेशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भालेकर यांनी दिला.शिष्टमंडळात फेडरेशनचे महासचिव आनंद चौरे, कार्याध्यक्ष रवी तेलरांधे, टायगर आॅटोरिक्षा संघटनेचे जावेद शेख, सचिव प्रकाश साखरे, किशोर सोमकुंवर, किशोर बंबोले, रवी सुखदेवे, देवीदास महल्ले, आसीफ भाई, किशोर इलमकर, आनंद मानकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनauto rickshawऑटो रिक्षा