शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

निवासी डॉक्टर आक्रमक, उपसले संपाचे हत्यार!

By सुमेध वाघमार | Updated: February 22, 2024 18:32 IST

मेयो, मेडिकलच्या वाढल्या अडचणी 

नागपूर : प्रत्येक निवासी डॉक्टरला वसितगृहाची सोय, विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ आणि दर महिन्याला १० तारखेच्या आत विद्यावेतन देण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आक्रमक झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून त्यांनी संपाचे हत्यार उपसले. यामुळे मेयो, मेडिकलच्या अडचणी वाढल्या असून संप कायम राहिल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.      विविध मागण्यांसाठी ‘सेंट्रल मार्ड’ने २०२३ मध्ये संप पुकारला होता. त्यावेळी शासनाकडून निश्चीत तारखेला विद्यावेतन व वसितगृहाची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. मागील महिन्यात पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागासोबत बैठक झाली. ‘मार्ड’ने आपल्या मागण्या रेटून धरल्या. मात्र, आश्वासनापलिकडे पदरी काहीच पडत नसल्याचे पाहत, अखेर ‘सेंट्रल मार्ड’ने  ७ फेब्रुवारीपासून संपाचा इशारा दिला. 

या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. परंतु त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही या संदर्भात शासन निर्णय आणि इतर मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस पावले उचलली नाही. यामुळे संप पुकारण्यात आल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. गुरुवारी सांयकाळी ५.३०वाजता निवासी डॉक्टरांनी मेडिकलच्या ‘ओपीडी’समोर नारे निदर्शने केले. 

संपातून आप्तकालीन विभाग वगळलेमेडिकल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. शुभम महाल्ले म्हणाले, या संपातून आपत्कालीन विभाग व आपत्कालीन स्थितीतील शस्त्रक्रिया वगळण्यात आल्या आहेत. येथेच निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. परंतु  बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड व नियोजित शस्त्रक्रियेत डॉक्टर मदत करणार नाहीत. ‘सेंट्रल मार्ड’च्या पुढील सूचना येईपर्यंत संप सुरू राहिल.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर