शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:11 IST

वीज दरवाढीला विरोध करीत  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला.

ठळक मुद्देविद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत काँग्रेसचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज दरवाढीला विरोध करीत  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी दरवाढीबाबत दाखल केलेली याचिका तातडीने रद्द करण्याची मागणी लावून धरली. शेवटी पोलिसांनी अंदोलकांना ताब्यात घेत सभागृहाबाहेर काढले. वाढता गोंधळ पाहून जनसुनावणी २० मिनिटे थांबविण्यात आली होती.महावितरणने ३४६४६ कोटी रुपयांचे महसूल तोट्याचा हवाला देत याच्या भरपाईसाठी वीजदरात वाढ करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाला परवानगी मागितली आहे. नियामक आयोग राज्याच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात जनसुनावणी घेऊन जनतेच्या मनात काय आहे, याचा मागोवा घेतला जात आहे. सोमवारी अमरावतीमध्ये झालेल्या जनसुनावणीनंतर आयोगाने मंगळवारी नागपुरातील वनामती सभागृहात जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळी १० वाजता याला सुरुवात होताच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सभागृहात धडकले. लोकांचे मत जाणून घेण्यासाठी आयोगाचे सचिव अभिजित देशपांडे, सदस्य आय. एम. बोहरी व मुकेश खुल्लर उपस्थित होते. महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांनी, विजेची दरवाढ का, हे सांगायला सुरुवात करताच काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील हे आपल्या समर्थकांसह पोहचले. सभागृहात उपस्थित युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजीला सुरुवात केली. सभागृहातील सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना व्यासपीठाकडे जाण्यापासून थांबविले. यामुळे गोंधळ आणखी वाढला. या गोंधळात आयोगाचे सदस्य उठून निघून गेले. साधारण २० मिनिटांपर्यंत हा गोंधळ सुरू होता.या दरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना व्यासपीठाच्या समक्ष आपल्या सूचना मांडण्याचा सल्ला दिला. देशपांडे यांनी संयम ठेवून आयोगाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. या वेळी प्रफुल्ल गुडधे यांनी वितरण हानी कमी झाली असतानाही दरवाढ का, असा सवाल करीत जनसुनावणीलाच अवैध ठरविले. विना अध्यक्षांच्या उपस्थितीत आयोग जनतेचे मत ऐकूच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. देशपांडे यांना लक्ष्य करीत ते म्हणाले, मागील सुनावणीच्या दरम्यान देशपांडे यांनी महावितरणाच्यावतीने दरवाढीची याचिका दाखल केली होती. अशावेळी आयोगाच्या सचिवाच्या रूपात त्यांच्याकडून न्यायाची कशी अपेक्षा केली जाऊ शकते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला घेऊन पुन्हा गोंधळ घातला. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले व सभागृहाबाहेर काढले. 

 

टॅग्स :electricityवीजagitationआंदोलन