शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधक संजय वाघ यांचे निधन : ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला दिले होते आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:37 IST

‘सिरी’चे (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक व प्रसिद्ध संशोधक डॉ.संजय मोरेश्वर वाघ (६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उपराजधानीतील वैज्ञानिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला त्यांनी आव्हान दिले होते व ते सप्रमाण सिद्धदेखील करुन दाखविले होते. त्यांचा जगभरात लौकिक होता हे विशेष.

ठळक मुद्देनागपुरातील संशोधन चळवळीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सिरी’चे (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक व प्रसिद्ध संशोधक डॉ.संजय मोरेश्वर वाघ (६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उपराजधानीतील वैज्ञानिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. ‘आईनस्टाईन’च्या सापेक्षतावादाला त्यांनी आव्हान दिले होते व ते सप्रमाण सिद्धदेखील करुन दाखविले होते. त्यांचा जगभरात लौकिक होता हे विशेष.डॉ.वाघ यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ होते. नागपुरातूनच विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘फिजिक्स’ व ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’मध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन केले. चांगली नोकरी असताना संशोधनासाठी त्यांनी त्यावर पाणी सोडले. आयुष्यभर त्यांनी संशोधनासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. नागपुरात संशोधनाप्रति जागरुकता वाढावी व विशेषत: शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत याचे महत्त्व पोहोचावे यासाठीदेखील ते प्रयत्नरत होते. यासाठी त्यांनी ‘सिरी’ची स्थापना केली होती. नागपुरात २०१८ साली त्यांच्या पुढाकारातून भौतिक विश्वासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित झाले होते.त्यांच्या निधनामुळे शहरातील संशोधन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे संशोधनासह ते क्रीडाप्रकारातदेखील कुशल होते. रेशीमबाग जिम्नॅस्टिक मंडळाचे ते उपाध्यक्ष होते व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी मल्लखांब स्पर्धादेखील गाजविल्या होत्या.अखेरपर्यंत संशोधनाचाच विचारआतादेखील त्यांनी ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’वर काम सुरू केले होते व ‘बेन्डींग ऑफ लाईट’वर संशोधन कार्य अखेरच्या टप्प्यात आले होते. नागपुरात असूनदेखील ते जगभरातील संशोधकांच्या नियमित संपर्कात असायचे. दक्षिण अफ्रिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ क्वाझुलू-नाताळ’शी तर ‘सिरी’चा सामंजस्य करारच झाला होता व नियमितपणे तेथे शिकवायला जात.‘आईनस्टाईन’च्या सिद्धांतातील समोर आणल्या त्रुटीडॉ.संजय वाघ यांनी आपल्या संशोधन ‘पेपर’मधून आईनस्टाईनचा जगप्रसिद्ध विशिष्ट सापेक्षतावाद प्रयोगाच्या निष्कर्षांतील त्रुटी समोर आणल्या होत्या. डॉप्लरचा परिणाम अभ्यासण्यातील चुकीकडे लक्ष वेधत आईनस्टाईनचा जगप्रसिद्ध विशिष्ट सापेक्षतावाद प्रयोगांच्या विपरीत निष्कर्ष देतो, असे त्यांनी सिद्ध केले होते. सापेक्षवादावर लिहिलेल्या ‘सब्टल्टी इन रिलेटीव्हिटी’ या पुस्तकात हे संशोधन सविस्तरपणे मांडले होते. त्यांचे संशोधन जगभरात मान्यता असलेल्या ‘जर्नल्स’मध्येही प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे ‘आईनस्टाईन’ त्यांच्या आदर्शांपैकी एक होते व ते हयात असते तर त्यांनीही आपल्या सिद्धांताचा स्वीकार केला असता, असा विश्वास डॉ. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता.

टॅग्स :ResearchसंशोधनDeathमृत्यू