शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

विदर्भात सापांच्या विषावर संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:45 IST

विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देविषातून तयार केले जाईल अ‍ॅन्टी व्हेनम औषधहिंगणा, उमरेड येथून एकत्रित केल्या जात आहेत विषारी सापांच्या प्रजाती

योगेंद्र शंभरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. येथील सापांचे विष किती प्रमाणित विषारी आहे, यावर संशोधन करून सर्पदंशाच्या उपचारासाठी प्रभावी असलेले ‘अ‍ॅन्टी व्हेनम’ औषध तयार करण्यात येणार आहे. यासाठी काही दिवसांपासून हाफकिन इन्स्टिट्यूटच्या चमूने नागपुरात आपल्या कार्यालयात सुरुवात केली आहे.वरिष्ठ वन अधिकाऱ्यानुसार, हाफकिन इन्स्टिट्यूटला अ‍ॅन्टी व्हेनम तयार करण्यासाठी शासनाची मान्यता आहे. यामुळे विषारी सर्पदंशाच्या रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक औषध तयार करण्यासाठी सापाचे विष एकत्रित करणे व संशोधनासाठी एका जिल्ह्यातील सापांना दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्याचा परवाना वन विभागाद्वारे दिला जातो. सूत्रानुसार, संपूर्ण राज्यात हाफकिनला सापांना एकत्रित करण्याची परवानगी आहे. आतापर्यंत या संस्थेचे प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र, सावंतवाडी, मराठवाडा भागातील सापांचे विष काढून अ‍ॅन्टी व्हेनम तयार करायचे. परंतु विविध विभागात सर्पदंशाच्या प्रकरणात अ‍ॅन्टी व्हेनम औषधांचा प्रभाव कमी-जास्त असतो. अनेक वेळा सर्पदंशाच्या रुग्णाला १० ते १२ अ‍ॅन्टी व्हेनमचे डोज द्यावे लागतात. अशास्थितीत प्रभावशाली अ‍ॅन्टी व्हेनम तयार करण्यासाठी जास्त विषारी प्रजातीचे साप आणि त्या भागाची माहिती असणे आवश्यक असते. यासाठी यावेळी विदर्भातील वनक्षेत्रात आढळून येणारे विषारी साप एकत्रित केले जात आहे. मागील दोन दिवसात हिंगणा आणि उमरेडमधून विषारी साप एकत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.

विषारी साप सोबत नेणारसाप हा ‘शेड्यूल’ प्राणी आहे. यामुळे त्याचा पंचनामा केला जाईल. नागपूर वन विभागाच्यावतीने वाहतुकीचा परवाना दिला जाईल. त्यानंतर विषारी साप घेऊन टीम ७ सप्टेंबर रोजी मुंबईसाठी निघेल. यासाठी दोन सदस्यीय चमू प्रत्येक जिल्ह्यात काम करीत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

काही बोलण्यास दिला नकारनागपूरच्या सेमिनरी हिल्समध्ये पोहचलेल्या चमूतील सदस्यांनी या दौऱ्यासंबंधी काही बोलण्यास नकार दिला. यासंदर्भात हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :snakeसापwildlifeवन्यजीव