शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, गडचिरोलीतील आदिवासींच्या रोगांवर संशोधन; आरोग्य विद्यापीठाचा ‘ब्लॉसम’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:26 IST

स्तनाचा कॅन्सरपासून ते लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारावर अभ्यास

नागपूर :चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासींमधील विविध रोगांवरील संशोधनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉसम’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ‘लिव्हर अँड लाईफ स्टाईल्स डिसीज’वर अभ्यास केला जाणार आहे.

या संशोधन कार्याचा प्रारंभप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, उपक्रमाचे समन्वयक डॉ. संजीव चौधरी, ट्रायबल हेल्थ रिसर्चर डॉ. दिलीप गोडे, आदी उपस्थित होते.

- दूर्गम भागात शिक्षण, संशोधन गरजेचे

कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सांगितले, आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न, आरोग्य विषयक समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी ‘ब्लॉसम’च्या माध्यमातनू राज्यातील दुर्गम भागातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘ब्लॉसम’ नावात ब्रेस्ट कॅन्सर, लिव्हर डिसऑर्डर, ऑस्टिओपोरसिस, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार, सिकलसेल, मुखाचे आजार आणि मालन्युट्रिशन, आदी आजारांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

- ‘ब्लॉसम’ उपक्रम विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण

डॉ. आमटे यांनी सांगितले की, ‘ब्लॉसम’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारी माहिती संशोधन आणि विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आदिवासी भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करणे कौतुकास्पद आहे.

- उपक्रम तीन टप्प्यांत कार्यान्वित

विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. चौधरी यांनी सांगितले की, ‘ब्लॉसम’ प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्क्रीनिंग, सोल्यूशन आणि नियोजन, दुसऱ्या टप्प्यात आदिवासी लोकसंख्येमध्ये विविध रोगांचे प्रमाण निश्चित करणे, तर तिसऱ्या टप्प्यात निष्कर्षांवर आधारित उपाययोजना केल्या जाणार आहे. हा प्रकल्प चंद्रपूरगडचिरोली, देवरी व गोंदिया आणि रामटेक व पारशिवनी या भागातील प्रत्येकी सहा गावांमध्ये राबविला जाईल. जवळपास ८ ते १० हजार नागरिकांचा यात समावेश असेल.

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूरGadchiroliगडचिरोली