शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; ३६१ गटग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा थंडावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:01 IST

रविवारी मतदान : सोमवारी मतमोजणी

नागपूर : जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी थंडावल्या असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची राजकीय प्रतीष्ठा पणाला लावली आहे.  अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. 

निवडणूक हाेत असलेल्या ३६१ गटग्रामपंचायतींमध्ये काटाेल तालुक्यातील ५२, नरखेड २९, सावनेर २६, कळमेश्वर २१, रामटेक २८, पारशिवनी १७, माैदा ३१, कामठी १० उमरेड २६, भिवापूर ३६, कुही २२, नागपूर (ग्रामीण) २४ आणि हिंगणा तालुक्यातील ३९ गटग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सरपंचपदाची निवडणूक ही थेट मतदारांमधून हाेत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गटग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस व भाजप समर्थित गटांचे सरपंच व सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात असून, काही गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) समर्थित गटांचे उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुका जिंंकण्यासाठी काटाेल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. अनिल देशमुख व भाजपचे चरणसिंग ठाकूर, सावनेरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार व भाजपचे डाॅ. राजीव पाेतदार, हिंगण्यात भाजपचे आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश बंग, कामठीत भाजपचे आ. टेकचंद सावरकर व काँग्रेसचे सुरेश भाेयर, रामटेकमध्ये आ. आशिष जयस्वाल व प्रहारचे रमेश कारामाेरे, उमरेडमध्ये काँग्रेसचे आ. राजू पारवे व भाजपचे माजी आ. सुधीर पारवे यांनी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

३६५ ऐवजी ३६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक

जिल्ह्यातील ३६५ गटग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. कोंढाळी, बिडगाव आणि नीलडोह ग्रामपंचायतींना नगरपंचायत आणि डिगडोहला नगरपालिकेचा दर्जा प्रदान करण्यात आल्याने ३६५ ऐवजी ३६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान हाेणार असून, सोमवारी मतमोजणी हाेणार आहे.

दारूच्या वाहतुकीवर पाेलिसांचे लक्ष्य

या निवडणुकीत दारूची मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने नागपूर ग्रामीण पाेलिसांनी आधीच माेहफुलाच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हाेती. शिवाय, देशी आणि विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीवरही नागपूर ग्रामीण पाेलिस लक्ष ठेवून असले तरी अंतर्गत ओल्या पार्ट्या सुरूच आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूर