शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पतीच्या खुनातील ‘डेंटिस्ट’ पत्नीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: February 21, 2016 02:49 IST

व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या आपल्या पतीचा भोसकून खून केल्याचा आरोप असलेल्या डेंटिस्ट पत्नीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

सत्र न्यायालय : हुडकेश्वर भागातील प्रकरणनागपूर : व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या आपल्या पतीचा भोसकून खून केल्याचा आरोप असलेल्या डेंटिस्ट पत्नीचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. टिष्ट्वंकल रविकांत उके (४०), असे आरोपी महिलेचे नाव आहे. रविकांत मधुकर उके (४२), असे मृताचे नाव होते. खुनाची ही घटना २९ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर येथे घडली होती. प्रकरण असे की, रविकांत उके हे बुटीबोरील एका खासगी इस्पितळात पॅथॉलॉजिस्ट होते. त्यामुळे त्यांचे आठवड्यातील पाच दिवसांचे वास्तव्य बुटीबोरीतच असायचे. ते शनिवारी आणि रविवारी नागपुरातील श्रीरामनगर येथील आपल्या घरी मुक्काम करायचे. टिष्ट्वंकल ही देखील व्यवसायाने डेंटिस्ट आहे. पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशीही घरगुती कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. परिणामी टिष्ट्वंकलने भाजी कापण्याच्या चाकूने रविकांत यांच्यावर वार करून त्यांचा खून केला होता. बचावासाठी धावलेले आपले वृद्ध सासरे मधुकर रामचंद्र उके यांनाही तिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. आरोपी टिष्ट्वंकल उके हिने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता सरकार पक्षाने विरोध केला. प्रकरण गंभीर असल्याने आरोपी महिलेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)