शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:36 IST

रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनिवडणुका दुय्यम, संघटन मजबुतीवरच हवा भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इंदिसे यांनी व्यक्त केली.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे नगरसेवक विकास निकम, पक्षाचे महासचिव उत्तम खडसे उपस्थित होते. इंदिसे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक घरात लीडरशिप तयार झाल्याने ती वाटल्या गेली आहे. रिपाइंचे ऐक्य व्हावे, अशी आपली भूमिका राहिली आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपल्यासाठी निवडणुका दुय्यम आहेत. संघटना मजबूत करण्यावर आपला भर असल्याने एक दिवस रिपाइंचे ऐक्य नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात अनेक ठराव मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये ईव्हीएमने निवडणुका या पारदर्शी नसल्याने यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात याव्यात, रेशन दुकानातून वाटण्यात येणाऱ्या विविध वस्तू पूर्वीप्रमाणेच वाटण्यात याव्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरण्यात येणारी बहुसदस्यीय पद्धत त्वरित रद्द करून त्याऐवजी पूर्वीची एकसदस्यीय पद्धत लागू करण्यात यावी, आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अ‍ॅड. राजेंद्र पाटील, भाईलाल गोहेल, प्रा. राहुल मून, बनवारीलाल सोनी, रामदास म्हात्रे, हरिदास टेंभुर्णे, नटवरलाल परमार, डॉ. सुनीलकुमार भार्गव, प्रल्हाद सोनवणे, दत्ता शिंदे, डॉ. चरणदास जनबंधू, मनोहर ओगळे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.रिपाइंसाठी आपला गट विसर्जित करणारविविध गटांमध्ये विभागल्या गेलेली रिपाइं ही एकसंघ राहावी. मूळ रिपब्लिकन पक्ष जो आहे, तो कायम राहावा, त्यात सर्व गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याची सुरुवात आपण स्वत: करणार असून, मूळ रिपाइंमध्ये आपण आपला गट विसर्जित करून रिपाइंला मजबूत करणार असल्याचे इंदिसे यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर