शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

वाहतूक पोलिसांची तक्रार करा थेट ‘कॉल सेंटर’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:34 IST

कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांची तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी आता स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, वाहतूक पोलिसांनी ही नवी व्यवस्था केली आहे.शहरातील अपघाताला आळा घालण्यासाठी तैनात केलेले वाहतूक पोलीस नेमून दिलेल्या सिग्नलवर उभे न राहता दूर आडोशाला उभे राहतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकातील सिग्नलवर तैनाती केली जाते. मात्र, ते चौकाच्या बाजूला आडोशाला उभे राहतात. वाहनचालकाने नियम तोडावे आणि आपण त्याला पकडून त्याच्या खिशाचे माप घ्यावे, असा या पोलिसांचा हेतू असतो. सिग्नलवर पोलीस उभा दिसला तर कोणताही वाहनचालक नियम तोडण्याची हिंमत दाखवत नाही. मात्र, वाहतूक पोलीस सावज हेरण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसूर करीत असतात. त्यामुळे अपघात होतात अन् नाहक कुणाला जीवघेणी दुखापत होते. यासंबंधाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रस्त्यावरील अपघाताला आळा बसावा आणि रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासंबंधाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना २० मार्च २०१९ ला उच्च न्यायालयाने तैनातीच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाºया वाहतूक पोलिसाची नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यानुसार पोलीस नियंत्रण कक्षात वाहतूक शाखेच्या पोलिसांसंबंधीच्या तक्रारींसाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५५५६६ आणि २५५५५७७ असा आहे.गुणात्मक बदलाची अपेक्षाउपराजधानीत एकूण १६१ वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यातील ८७ वाहतूक सिग्नल चौकात वर्दळीच्या वेळेत १५४ पोलीस कर्मचारी नेमले जातात. तर, सर्वसाधारण वेळेत १११ कर्मचारी नेमले जातात. वाहतूक सुरळीत राहावी, कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, असा त्यामागचा हेतू असतो. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस या हेतूला हरताळ फासतात. यापुढे असे होऊ नये, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यात गुणात्मक बदल व्हावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रयत्नरत आहेत. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यात कसूर करत असेल, निष्काळजीपणे वागत असेल, व्यवस्थीतपणे आपले कर्तव्य बजावत नसेल तर अशा पोलिसांनी कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस