शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

रिपोर्ट द्या; अन्यथा अ‍ॅक्शन : सत्तापक्षाची मनपा प्रशासनाला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 22:09 IST

तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.

ठळक मुद्देसात दिवसात रिपोर्ट न दिल्यास निलंबन : पाणीटंचाईवर विरोधक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.तीन महिन्यानंतर आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व भाजपाचे धरमपाल मेश्राम यांनी स्थगन प्रस्ताव आणून पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. चर्चेला सुरुवात झाली, परंतु सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जलप्रदाय विभागातील अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षाने प्रशासनाला धारेवर धरले.डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणासाठी चर्चा झाली होती. आता जूनचा दुसरा पंधरवडा सुरू आहे. परंतु अद्याप प्रशासनाने अ‍ॅक्शन रिपोर्ट सादर केलेला नाही. मोर्चे, धरणे व निदर्शने होत नाहीत. याचा अर्थ शहरात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होतोय असा नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा सदस्यांनी दिला.शहराला आता ७३० ऐवजी ६७० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चर्चेदरम्यान गुडधे व धरमपाल मेश्राम यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.शहरात समान पाणी वितरण होत नाही. चेहरा बघून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तानाची वनवे यांनी केला. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा भागातील दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पाणी गळती वेळीच रोखली असती तर १५ दिवस पुरेल इतके पाणी वाचले असते, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेसचे नगरसेवक पार्षद जुल्फेकार भुट्टो यांनी मोमीनपुरा भागातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई