शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने सुरू होणार मार्कण्डा देवस्थानाचा जीर्णोद्धार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 07:45 IST

Nagpur News गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देएप्रिल-मेपासून संवर्धनाच्या कामास होणार सुरुवात

अंकिता देशकर

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. साधारणत: या कामाला नव्या वित्त वर्षात एप्रिल-मे २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देवस्थानाच्या जीर्णोद्धाचे काम डिसेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. मात्र, ऐनकेन अडथळ्यांमुळे ते काम कधीच पूर्णत्वास गेले नाही. आता हे काम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी गेल्यावर्षी प्राप्त झालेला निधी संपला असून, पुढच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ विकासकामांवर भर देण्यात आला असून, अतिक्रमण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जीवघेण्या कोरोना संक्रमणाचा काळवगळता, २०१७ पासून जीर्णोद्धारामध्ये अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानेही कामाची गती मंदावल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

शेवटचे चित्र १९०४ सालचे

मंदिराचे उपलब्ध शेवटचे चित्र १९०४ सालचे असून, जीर्णोद्धाराची प्रक्रिया अतिशय संथ असते. मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होण्यासाठी किमान पाच वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, गेल्या पाच वर्षात ५० टक्के कामही झालेले नाही. मंदिरावर असणाऱ्या ३० पेक्षा जास्त लेअर्सचे काम अजून शिल्लक आहे. मुख्य मंदिराचे काम पूर्ण झाल्यावरच आवारातील २४ लहान मंदिरांच्या संवर्धनाचे काम सुरू होईल. हेमाडपंती शैलीतील आठव्या ते बाराव्या शतकादरम्यानचे हे मंदिर असल्याचे एएसआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक येतात. या यात्रेमुळे जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे येणार नाहीत, याची काळजी प्रशासकीय अधिकारी घेत असून, केवळ याच दिवशी भक्तांना गर्भगृहात जाऊन आशीर्वाद घेण्याची परवानगी असते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Templeमंदिर