शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  रोडवरचे यमदूत हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:17 IST

रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देविजेच्या खांबांविरुद्ध याचिका : हायकोर्टाची मनपाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवर धोकादायकरीत्या उभे असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी या प्रकरणात नगर विकास विभागाचे सचिव, ऊर्जा विभागाचे सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, महावितरण कंपनी, महापारेषण कंपनी, एसएनडीएल कंपनी व महापालिका यांना नोटीस बजावून १० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या विषयावर तयार केलेल्या याचिकेमध्ये शहरातील २२ रोडवर २२ धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स असल्याची माहिती देण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मस रोडवर आले. असे धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात अक्षम्य उदासीनता दाखवली. परिणामी, धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मस्र् िआजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. मनपाने न्यायालयाचा अवमान केला. तसेच, २००१ मध्ये धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी धोकादायक विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात यावेत व जबाबदार अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार करवाई करण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज