शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी आवास योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करा, नोंदणीला गती द्या : पालकमंत्र्यांचे आदेश

By आनंद डेकाटे | Updated: June 16, 2025 19:28 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : सरपंच व ग्रामसेवकांसाठी कार्यशाळा

आनंद डेकाटे, नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करीत योजनेच्या ऑनलाइन नोंदणीला अधिक गती देण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, एनएमआरडीए क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० ही सर्वसामान्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे या योजनेची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन, सरपंच व ग्रामसेवकांच्या सहकार्याने नाव नोंदणीस गती देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक नासुप्र सभापती तथा एनएमआरडीए आयुक्त संजय मीणा यांनी केले.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरवजिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींचा गौरव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यात मौदा तालुक्यातील वाकेश्वर, कोदामेंढी, सिरसोली, कामठी तालुक्यातील महालगाव, उमरी, उमरेड तालुक्यातील सुरगाव कुही तालुक्यातील तितुर, सावनेर तालुक्यातील पिपळा डा. ब. तसेच पारशिवनी तालुक्यातील उमरी पाली या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांना पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर