शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे खटले निकाली काढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:08 AM

उपराजधानीतील खड्डे आणि अपघाताचे दोन्ही खटले ३० जानेवारी २०२० पर्यंत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देदोषारोपपत्रांसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत वेळहायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर व लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील रोडवरील धोकादायक खड्डे व त्यामुळे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपींविरुद्ध येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात यावीत व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने हे दोन्ही खटले ३० जानेवारी २०२० पर्यंत निकाली काढावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी दिले.सदर पोलिसांनी मनपा अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध भादंविच्या कलम २८३(सार्वजनिक मार्गावर धोका), ३४१ (अवैध प्रतिरोध) व ३४ (समान उद्देश) तर, लकडगंज पोलिसांनी बीएसएनएल कंत्राटदार व टिप्पर चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९ (सार्वजनिक रोडवर भरधाव वाहन चालवणे), ३०४-ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) व ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास संपवून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे तयार केली आहेत. दोषारोपपत्रे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्यांची माहिती ८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाला देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. आर. पी. जोशी व अ‍ॅड. आकांक्षा वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहरामध्ये रोडवरील धोकादायक खड्ड्यांमुळे गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर, २९ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाले. रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च फौजदारी याचिका दाखल करून घेतली आहे. शहरात एकूण २२०१.१९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या २९.८०, राज्य महामार्ग प्राधिकरणच्या ६.७० तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८४.४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर सुधार प्रन्यासकडील सात योजना व गुंठेवारी क्षेत्रात काही रस्ते आहेत. यापैकी अनेक रस्त्यांवर धोकादायक खड्डे आहेत. या प्रकरणावर आता ८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. या प्रकरणात अ‍ॅड. राहिल मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.तक्रारींची तातडीने दखल घ्याअपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व टिष्ट्वटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे. यावर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारी योग्य कारवाईसाठी मनपाच्या संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जाणार आहेत. अशा तक्रारी मिळाल्यानंतर तीन दिवसात खड्डे बुजवण्यात यावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले आणि तीन दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा असे सांगितले. आवश्यक तेव्हा पोलिसांनीदेखील तक्रारी नोंदवाव्यात असे आदेश न्यायालयाने दिले.

तक्रारीसाठी मनपाचे मोबाईल अ‍ॅपनागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता महापालिका मोबाईल अ‍ॅप तयार करीत आहे. सध्या त्यांना जीमेल, टिष्ट्वटर व फेसबुकवर तक्रारी मिळत असून त्यांचे निराकरण केले जात आहे. मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखालील समिती खड्डे बुजवण्याच्या कारवाईचा नियमित आढावा घेत आहे. त्यात हयगय करणारे अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तसेच, त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे. महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय