शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

वाहनांवरील काळी फिल्म तत्काळ काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:52 IST

काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनाच्या काचेवरची काळी फिल्म तात्काळ काढून टाका

मुंबई/नागपूर : काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनाच्या काचेवरची काळी फिल्म तात्काळ काढून टाका, असे आदेश वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केले आहेत. नागपूरसह राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त कार्यालयांना शनिवारी हे आदेश मिळाले आहे. त्यामुळे काळी फिल्म लावून धावणाºया वाहनांवर सोमवारपासून राज्यभरात विशेष कारवाईची मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे.केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी नाही. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात.गैरप्रकारात गुंतलेलली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. २६५/ २०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची काही दिवस पोलिसांनी अंमलबजावणी केली. आता मात्र जिकडे तिकडे काचांवर काळी फिल्म लावून धावणारी वाहने सर्वत्र आढळतात.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशाची अवमानना केल्याचे समजण्यात येईल आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचे मानले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सूटअर्थात अति महत्वाच्या व महत्वाच्या व्यक्तीसाठी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव झेड व झेड प्लस सुरक्षा असणाºया व्यक्तींच्या वाहनांना या कारवाईतून सुट देण्यात आलेली आहे.

टॅग्स :carकारPoliceपोलिस