शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कर्करोग पीडितांना ‘मेट्रोनॉमिक’ प्रणालीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 10:26 IST

कर्करोगावर एक महिन्याचा लाखो रुपयांपर्यंत होणारा औषधांचा खर्च केवळ एक हजार रुपयात होईल, अशी पर्यायी औषधे व उपचार पद्धती विकसित करण्यात आली असून ती टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली यांनी तयार केली आहे.

ठळक मुद्दे केमोथेरपीवर लाखोंचा होणारा खर्च केवळ हजारात

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारण ६० ते ७० टक्के कर्करोग रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात. यातील काही आर्थिक विवंचनेमुळे उपचार घेत नाहीत किंवा चालू असलेले उपचार मध्येच सोडून देतात. यावर मात करण्यासाठी एक महिन्याचा लाखो रुपयांपर्यंत होणारा औषधांचा खर्च केवळ एक हजार रुपयात होईल, अशी पर्यायी औषधे व उपचार पद्धती विकसित करण्यात आली.  ही उपचार पद्धती टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली यांनी तयार केली आहे. नागपुरात विशेषत: मुख कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांच्यामध्ये या प्रणालीचे आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत. ही ‘मेट्रोनॉमिक’ औषध प्रणाली कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासा देणारी ठरत आहे, अशी माहिती प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी दिली.डॉ. मानधनिया म्हणाले, भारतात दरवर्षी कर्करोगामुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कर्करोगाच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. ५० टक्के कर्करोगाला तंबाखू हे कारणीभूत ठरते. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कर्करोगाचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे. विशेष म्हणजे, कर्करोगाचे जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यात तिसºया व चौथ्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेवरील असतात.यामुळे आजारापेक्षा पैसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. परिणामी, काही रुग्ण विनाउपचाराने तर काही अर्धवट उपचार करतात. यावर ‘मेट्रोनॉमिक’ उपचार पद्धती विकसित करण्यास तज्ज्ञांना यश आले आहे. या कार्यासंबंधी विशेष लेख ‘लान्सेट’च्या कर्करोगशास्त्र विषयाच्या वैद्यकीय पत्रिकेतील अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हजारो रुग्णांवर या उपचार पद्धतीचा यशस्वी अवलंबही करण्यात आला आहे.

काय आहे मेट्रोनॉमिक प्रणालीकमी मात्रांच्या औषधांचा एकत्रितपणे उपायेग करून ‘मेट्रोनॉमिक’ नावाची ही नवीन नियंत्रित अशी उपचार पद्धती आहे. मेट्रोनॉमिक औषध प्रणालीत तोंडाद्वारे गोळ्यांच्या स्वरुपात केमोथेरपी घेता येते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मान्यताप्राप्त औषधांचा वापर केला जातो. या उपचारपद्धतीत रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही, किंवा वारंवार रुग्णांवर उपचारासाठी खेटा मारण्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास कमी होतो. औषधांचा रुग्णाच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम दिसून आले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असते.

५०० रुग्णांवर उपचारमुखाच्या कर्करोगाचे साधारण ५०० रुग्णांवर ‘मेट्रोनॉमिक’ औषध प्रणालीचा वापर केला आहे. त्यांच्यामधील बदल समाधानकारक आहेत. परंतु या उपचाराची गरजच पडणार नाही, याची काळजी घेणे प्रत्येकाच्या हाती आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहिल्यास, योग्य जीवनशैली आत्मसात केल्यास व नियमित व्यायाम अंगिकृत केल्यास या आजाराला दूर ठेवणे शक्य आहे.-डॉ. सुशिल मानधनिया ,प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ

टॅग्स :cancerकर्करोग