शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धर्म नेहमीच न्यायसंगत नसतो - सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:06 IST

मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुगांतर व्याख्यानमाला : ‘न्याय’ विषयावर तिसरे प्रवचन पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूल्य निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात तर धर्मनिष्ठा समूह आणि जातीच्या दिशेने जाणाऱ्या असतात. मात्र न्याय निष्ठा त्यागाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. असे असले तरी धर्म हा नेहमीच न्यायाची भूमिका घेत नसतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने युगांतर व्याख्यानमाला अंतर्गत प्रा. द्वादशीवार यांचे ‘न्याय’ या विषयावर तिसरे प्रवचनपुष्प मंगळवारी पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी साक्रेटिस आणि प्लेटो यांच्या न्यायासंदर्भातील संकल्पाना सांगितल्या. फॅसिमॉकस हा विचारवंत सत्ताधारी सांगतील तोच न्याय, असे म्हणतो. त्याच्या बाजूने बोलणारे न्यायी, विरोधात बोलणारे देशद्रोही ठरतात. कॅसिकल्स तत्वज्ञही हेच सांगतो. प्लेटोच्या राज्यकर्ता होण्याच्या संकल्पना वेगळ्या आहेत. त्यानुसार धर्म नेहमीच न्यायाची भूमिका घेत नाही. साक्रेटिकसच्या न्याय संकल्पना गुणवत्ता असेल तरच टिकेल, असे सांगते. त्यामुळे गुणवता  ही  सन्मानाचा विषय झाली पाहिजे.ते म्हणाले, घटना जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार झाली आहे. न्यायाचा विचार करताना व्यक्ती सर्व श्रेष्ठ आहे. जगात १४ हजार युद्ध झालीत, त्यामध्ये लाखो माणसे मारल्या गेली. १६ कोटी ९० लाख वैचारिक दुराग्रहापोटी मारली गेलीत. इच्छा व वासना संपल्यावर युद्ध करण्यास आपले तत्वज्ञान सांगते. खरे तर त्यानंतर युद्धाची इच्छाच राहात नाही. म्हणूनच कुरूक्षेत्रावर सांगितलेली भगवत्गीता हा युद्ध सांगणारा ग्रंथ नसून अहिंसा सांगणारा ग्रंथ ठरतो.न्याय ही माणसाला मिळालेली संजीवनी आहे. याचं संजीवनीच्या आधारावर माणूस जगत असतो. आपण ज्या विचारांनी जगतो, त्याची चिकित्सा कधी करत नाही. माणूस म्हणून एकारलेपणाचा विचार करणे हाच न्यायाचा खरा मार्ग आहे.न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. नागरिकांना घटनादत्त अधिकार आहेत. ते निर्माण करणारी व्यवस्था राज्यांनी निर्माण करायला हवी. कोणताही धर्म स्त्रियांना न्याय देत नाही, ईश्वर सुद्धा नाही. आपली गुणवत्ता निर्माण करणे, गुणवत्ता मानणे हा न्याय आहे. न्याय व्यवस्थेत समतोल साधला पाहिजे. घटनेने नागरिकांना अधिकार दिले आहेत. ते निर्माण करण्याची व्यवस्था राज्यांनी निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या व्याख्यानाला माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, साहित्यिक महेश एलकुंचवार, गिरीष गांधी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरliteratureसाहित्य