शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

दिग्गजांना दिलासा,वस्त्यांमध्ये फेरबदल

By admin | Updated: October 8, 2016 03:02 IST

चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या महापालिकेची निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार

नागपूर : चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या महापालिकेची निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. या सोडतीत बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला असून त्यांचे प्रभाग सेफ झाले आहेत. महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्यासह महापालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. काही प्रभागात दोन पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना एकमेकांविरोधात लढण्याशिवाय पर्याय नाही. काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन ते तीन नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना स्वपक्षातच तिकिटासाठी लढावे लागणार आहे. काही नगरसेकांना मात्र लॉटरीच लागली आहे. त्यांना तब्बल दोन मतदारसंघात पाय ठेवता येणार आहे. नागपूर महापालिकेच्या ३८ प्रभागातून १५१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यातील ५० टक्के म्हणजे ७६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड, गुड्डू तिवारी, अरुण डवरे, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, अपक्ष नगरसेवक परिणय फुके, राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार यांना नशीबाने साथ दिली आहे तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, काँग्रेसचे डॉ. प्रशांत चोपडा, शिवसेनेचे बंडू तळवेकर यांचे प्रभाग आरक्षणात फसले आहेत. या आधारावर झाली सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी राखीव तसेच खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमानुसार राखीव जागांची सोडत काढण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. यात अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ इतकी आहे. नागपूर शहराची लोकसंख्या व महापालिकेचे १५१ प्रभाग विचारात घेता प्रत्येक प्रभागात सरासरी ६४८३४ मतदार राहणार असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. जोशी, ठाकरे, यादव कुणाचा त्रिफळा चित ? प्रभाग क्रमांक १६ मध्ये महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक मुन्ना यादव यांचा जुना प्रभाग संपूर्ण आला आहे. याच प्रभागात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी व अविनाश ठाकरे यांचा अर्धा-अर्धा प्रभाग आला आहे. या प्रभागात एकच जागा खुली आहे. येथील एक जागा अनुसूचित जाती, दुसरी जागा ओबीसी महिला व तिसरी जागा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाली आहे. त्यामुळे या भाजपच्या या तीन दिग्गजांपैकी दोघांचा त्रिफळा चित होणार हे नक्की. त्यातल्या त्यात मुन्ना यादव व अविनाश ठाकरे यांच्यापैकी एकाला आपल्या पत्नीला ओबीसी महिलामधून लढविण्याची संधी आहे. यातही सामना टफ आहे. ठाकरे की गुडधे ? प्रभाग क्रमांक ३८ हा शेवटचा व तीन सदस्सीय प्रभाग आहे. या प्रभागात अनुसूचित जाती व सर्वसाधारण या दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्या. ओबीसीची फक्त एक जागा उरली आहे. या प्रभागात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या प्रभागातील टाकळीसीम, पूर्णपणे जोडल्या गेले आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या प्रभागातील शिवणगाव, जयताळ्यासह बहुतांश भाग समाविष्ट झाला आहे. सोडत काढतेवेळी गुडधे उपस्थित होते. अनुसूचित जातीची पहिली जागा महिलासाठी आरक्षित होताच ते खूश झाले. ते या प्रभागातून लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसची व्होटबॅक असलेले टाकळीसीम यात आल्यामुळे विकास ठाकरे हे देखील याच प्रभागातून लढतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यामुळे आता तिकीटासाठी ठाकरे व गुडधे यांच्यात रस्सीखेच होते की ठाकरे हे शेजारच्या प्रभाग क्रमांक ३७ मधून लढतात याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग ३७ मध्ये गोपालनगर, सुभाषनगर आदी वस्त्यांचा समावेश आहे. येथून ठाकरे यापूर्वी लढले आहेत. प्रभाग ३७ मध्ये एकच जागा खुली आहे. त्यामुळे ठाकरे प्रभाग ३७ मध्ये सरकले तर त्यांचा सामना भाजपचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांच्याशी निश्चित मानला जात आहे. दटके, राऊत, फडणवीस एका प्रभागात महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत यांच्यासह महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस यांचा प्रभाग एकच झाला आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये या सर्वांना एकत्र लढण्याची संधी आहे. होले-भोयर, धवड-तिवारी एकत्र प्रभाग ३१ मध्ये उपमहापौर सतीश होले व भाजपचे नगरसेवक डॉ. छोटू भोयर एकाच प्रभागात आले आहेत. यापूर्वी होले यांनी या भागातून निवडणूक लढविली होती. या प्रभागात अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन जागा राखीव असल्याने दोघांनाही संधी आहे. काँग्रेसचे प्रशांत धवड व योगेश तिवारी यांनाही संधी आहे. त्यामुळे या प्रभागात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. नगरसेविका दिव्या घुरडे, सारिका नांदूरकर ,सुजाता कोंबाडे यांनाही या प्रभागात संधी आहे.