शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाडी नगर परिषदेला दिलासा : विकास कामाविरुद्धचा अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:18 IST

एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देनागपूर दिवाणी न्यायालयाचा निकाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता.वाडी नगर परिषदेला संबंधित भूखंडावर विकास काम करण्याचा अधिकार नाही, हे घोषित करण्यासाठी अग्रवाल यांनी या न्यायालयात १५ एप्रिल २०१९ रोजी दावा दाखल केला आहे. त्यात हा अर्ज दाखल करून विकास कामावर मनाईहुकूम देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. संबंधित भूखंड अग्रवाल यांच्या मालकीचा आहे व त्याचा अग्रवाल यांच्याकडे ताबा आहे, असा दावा अर्जात करण्यात आला होता. नगर परिषदेने लेखी उत्तर सादर करून अग्रवाल यांचे मुद्दे खोडून काढले. अग्रवाल हे शुद्ध हेतूने न्यायालयात आले नाहीत. संबंधित भूखंड नागपूर सुधार प्रन्यासला दान देण्यात आला होता. त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ही अवैध कृती नाही. या कामासाठी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी टेंडर जारी करण्यात आले आहे, अशी माहिती नगर परिषदेने न्यायालयाला दिली. नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर