शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मृतांच्या नातेवाईकांना आणाव्या लागतात बर्फाच्या लाद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:33 IST

कामठी उपजिल्हा रुग्णालयातील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत.

ठळक मुद्देशवागृहातील फ्रिजर मशीन बंदकामठी उपजिल्हा रुग्णालयातील वास्तव

सुदाम राखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृह तयार करण्यात आले आहे. येथील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत. यासाठी त्यांना बाराशे ते पंधराशे रुपयांचा फटका बसतो.

कामठी शहरातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे कामठी, मौदा, खात, पारशिवनी, मनसर खापरखेडा या परिसरातील अपघात, वीज कोसळणे, आत्महत्या, खून तसेच अन्य घटनांमधील मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले जातात. काही कारणास्तव तपासणीला विलंब होत असल्याने मृतदेह सुरक्षित रहावेत म्हणून या रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृहाची निर्मिती केली आहे. या शीतगृहातील फ्रिजर मशीनमध्ये दोन मृतदेह ठेवण्याची सोय आहे. मात्र ही मशीन गेल्या चार वर्षापासून बंद आहे.

शवविच्छेदन गृहात ठेवलेले मृतदेह उत्तरीय तपासणीअभावी कुजले असल्याने त्याची दुर्गंधी सुटते. त्या दुर्गंधीचा परिसरात राहणाऱ्या तसेच या भागातून रोज ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.रुग्णालय प्रशासनाने ही मशीन दुरुस्त करण्याची वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली आहे. परंतु कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षापूर्वी कन्हान नदीकाठाने एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृताची ओळख होईपर्यंत प्रेत शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले होते. अनोळखी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कुणीही बर्फाच्या लाद्याची सोय करीत नसल्याने तो मृतदेह तसाच पडून असतो. यासंदर्भात परिसरातील महिलांनी मोर्चा काढून उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली होती. त्या दरम्यान कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांनी महिलांना शांत करून कुजलेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले होते. उपजिल्हा रुग्णालय शवगारातील फ्रिजर मशीनची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात अद्यावत फ्रिजर मशीन व विविध साहित्याच्या खरेदीसाठी निधी मंजूर झाला आहे. लॉकडाऊनमुळे या कामात व्यत्यय आला आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.- डॉ. श्रद्धा भाजीपाले,प्रभारी अधीक्षक, कामठी उपजिल्हा रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य