शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नातेवाईकाने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:59 IST

झंडू बाम आणून देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत बोलवून एका आरोपीने महिलेवर (वय ३२) बलात्कार केला. ५ एप्रिलला दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने तब्बल १० दिवसानंतर गिट्टीखदान पोलिसांकडे नोंदविली.

ठळक मुद्देआरोपी सूरतमधील रहिवासी : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झंडू बाम आणून देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत बोलवून एका आरोपीने महिलेवर (वय ३२) बलात्कार केला. ५ एप्रिलला दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने तब्बल १० दिवसानंतर गिट्टीखदान पोलिसांकडे नोंदविली.पीडित महिलेचे कुटुंबीय मूळचे राजस्थानी आहे. रोजगाराच्या शोधात आलेली ही मंडळी सध्या गिट्टीखदानमध्ये राहते. महिलेचा पती फर्निचरचे काम करतो. तिला तीन मुलं आहेत. आरोपी महिलेचा भासरा (पतीचा चुलतभाऊ) आहे. तो सूरत(गुजरात)मध्ये राहतो. फर्निचरच्या कामाच्या निमित्ताने दोन आठवड्यापूर्वी तो नागपुरात आला होता. ५ एप्रिलला त्याला परत सूरतला जायचे होते. त्यामुळे महिलेच्या पतीने त्याला घरी जेवायला बोलविले. येथूनच त्याला रेल्वेस्थानकावर सोडून देण्याचे ठरले होते. सकाळी जेवणआटोपल्यानंतर ११.३० च्या सुमारास महिलेच्या पतीला त्याचे काम सुरू असलेल्या कार्यालयातून फोन आला. त्यामुळे काही वेळेत परत येतो, असे सांगून महिलेचा पती घरून निघून गेला. महिलेची मुले घराबाहेर खेळत होती तर आरोपी आणि महिला घरात एकटीच होती. ती घरातील काम आवरत असताना आरोपीने तिला झंडू बाम मागितली. ती आणून देताच त्याने तिचा हात धरून तिला जवळ खेचले. महिला आरडाओरड करणार हे लक्षात आल्याने आरोपीने तिचे तोंड दाबले. एका हाताने दार लावून घेतले आणि महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला बदनामीचा धाक दाखवून गप्प राहण्यास सांगितले. काही वेळेनंतर महिलेचा पती घरी आला. त्यानंतर त्याच्यासोबत आरोपी रेल्वेस्थानकावर आणि तेथून सूरतला निघून गेला.तातडीने पतीला सांगण्याचे टाळलेमहिलेने पतीला तातडीने हा प्रकार सांगण्याचे टाळले. दोन ते तीन दिवसानंतर तिने नवऱ्याजवळ आपबिती सांगितली. त्यामुळे नवरा बिथरला. त्याने आपल्या सर्व नातेवाईकांना हा प्रकार सांगून आरोपीला फोन करून जाब विचारला. तब्बल १० दिवस झाल्यानंतर त्याने पत्नीला या घटनेची तक्रार नोंदविण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी तिने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी सूरतमध्ये असल्याने त्याला अद्याप अटक झालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार