शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय ठगबाज टोळीतील दोघांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: January 26, 2017 02:40 IST

अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना कोट्यवधीने चुना लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठकबाज टोळीतील दोघांचा जामीन

सत्र न्यायालय : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरण नागपूर : अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना कोट्यवधीने चुना लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठकबाज टोळीतील दोघांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. इशाक ऊर्फ टिपू हुसैन काझी (५४) रा. मिरा रोड ठाणे आणि इम्रान ऊर्फ समीर इब्राहिम काझी (३५) रा. पांगलोली, जिल्हा रायगड, अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अमित बाबासो शिंदे रा. सातारा, अशोक अनिल पवार रा. वाळूंज बिड, चंद्रशेखर लालासाहेब शिंदे रा. वाळूंज, इशाक काझी, अर्शद मेहमूद अन्सारी रा. काशीपूर उत्तर प्रदेश आणि इम्रान काझी, अशा सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी तुकाराम पवार, प्रशांत आणि मायकल व सॅम नावाचे नायजेरियन व्यक्ती पोलिसांना पाहिजे आहेत. नागपुरात तूर्त या टोळीने अजनी जोशी वाडी येथील एलिशबा व्हिव्हियन डेमराईज आणि तिच्या भावाची १० लाख १३ हजार ७२९ रुपयांनी फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक २ डिसेंबर २०१४ ते १८ मे २०१५ या दरम्यान झालेली आहे. एलिशबा डेमराईज हिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी या टोळीविरुद्ध २४ मे २०१५ रोजी भादंविच्या ४१९, ४२०, ४६८, १२० (ब)आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (सी), ६६ (डी) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरण असे की, या आंतरराष्ट्रीय ठगबाज टोळीतील सदस्यांनी एलिशबाच्या मोबाईल आणि इमेल आयडीवर संपर्क केला होता. एलिशबा हिला युनायटेड स्टेट आॅफ अमेरिकेतील स्क्लमबर्गर येथील आॅईल अँड गॅस कंपनीत अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्ट मॅनेजर आणि तिच्या भावाला मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांना युनायटेड स्टेट दूतावासातील थॉमस वजदा यांच्या नावाचा गैरवापर करून वेगवेगळे खोटे ई-मेल पाठवीत होते. व्हिसा वर्क परमीट, एअर तिकिट आदीसाठी लागणाऱ्या प्रकियेच्या नावावर त्यांना ८ बँकांचे खाते क्रमांक देऊन त्यात वेळोवेळी १० लाख १३ हजार ७२९ रुपये जमा करण्यास भाग पाडले होते. त्यांना नोकरी न देता चक्क त्यांची या टोळीने फसवणूक केली होती. (प्रतिनिधी) शेकडो खातेधारकांचा टोळीत समावेश या ठगबाज टोळीचा इशाक काझी हा सूत्रधार आहे. त्याने २०१३ ते २०१५ या काळात शेकडो खातेधारकांना कमिशन देण्याचे आमिष दाखवून आपल्या टोळीत सहभागी केले होते. त्यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड इशाक आणि अरशद अन्सारी हे स्वत:जवळ ठेवून घेत होते. फसवलेल्या बेरोजगारांचा पैसा ही टोळी या खातेधारकांच्या खात्यात जमा करायला लावत होती. सप्टेंबर २०१३ ते १९ जानेवारी २०१५ या काळात एकट्या इशाकने ७० ते ८० बँक खातेधारकांवर लक्ष ठेवून, त्यांनी काढून दिलेले ५० ते ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. इशाक हा १९ आॅगस्टपासून आणि इम्रान हा २६ आॅगस्टपासून अटकेत असून, ते सध्या कारागृहात आहेत. या दोघांनी जामीन अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक एस. एस. संखे हे तपास अधिकारी आहेत.