शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करा : विदर्भ मोलकरीण संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:32 IST

घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करण्यात यावी, असंघटित क्षेत्रासाठी केंद्राप्रमाणे किमान वेतन विधेयक पारित करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देअप्पर कामगार आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करण्यात यावी, असंघटित क्षेत्रासाठी केंद्राप्रमाणे किमान वेतन विधेयक पारित करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रुपाताई कुळकर्णी व विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटले.डॉ. रुपाताई कुळकर्णी यांनी सांगितले, मोलकरीण व घरकामगार यांच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर २००८ साली महाराष्ट्रात घरकामगार कायदा करण्यात आला व त्यानंतर २०११ साली घरकामगार कल्याणकारी बोर्डाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ५५ ते ५९ वर्षे वयोगटातील घरकामगारांना १० हजार मानधन मुलांना विद्यावेतन सुरू झाले. मात्र २०१४ साली नवे सरकार सत्तेवर येताच घरकामगार बोर्ड बरखास्त करण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या गरीब कामगारांना मिळणारा लाभ बंद झाला आहे. घरकामगारांची अवस्था लक्षात घेऊन घरकामगार बोर्डाची पुन्हा स्थापना करण्यात यावी, घरकामगारांना वृद्धापकाळ पेन्शन लागू करण्यात यावी, ६० वर्षांवरील कामगारांची बोर्डात नोंदणी करावी, सिटी बस व मेट्रोमध्ये पास देण्यात यावे, या कामगारांना पीएफ लागू व्हावा, मुलांना शिष्यवृत्ती लागू करावी, आदी मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले. शिष्टमंडळात रजनी वंजारी, सुजाता भोंगाडे, सुरेखा डोंगरे, ममता पाल, शालू अखंड, लता धुर्वे, सरिता जुनघरे, कांता मडामे, मंजुळा मेश्राम, वैशाली शहाकार आदींचा सहभाग होता.

टॅग्स :WomenमहिलाEmployeeकर्मचारी