शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खुशखबर! नागपूर पथविक्रेता समितीची अधिसूचना जारी; पथविक्रेत्यांचे नियमन, पथविक्रेता क्षेत्र होणार स्थापित 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 7, 2022 17:44 IST

नागपूरमध्ये पथविक्रेत्यांचे नियमन आणि पथविक्रेता क्षेत्र स्थापित होणार आहे. 

नागपूर : नागपूरकरांकरिता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पथविक्रेत्यांमुळे नागपूरला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचे लवकरच निराकरण होणार आहे. राज्य सरकारने नागपूरकरिता स्थापित पथविक्रेता समितीची अधिसूचना ६ ऑक्टोबरला जारी केली आहे. परिणामी, समितीला अधिकृत स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरातील पथविक्रेत्यांचे नियमन करणे, पथविक्रेता क्षेत्र तयार करणे, पथविक्रेत्यांविरुद्धच्या तक्रारींचे निराकरण करणे इत्यादी जबाबदाऱ्या समितीकडे राहतील.पथविक्रेता समितीची स्थापना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. विविध अडथळ्यांमुळे हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक भूमिका घेतल्यामुळे महानगरपालिका व राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली. पथविक्रेता समितीमध्ये महानगरपालिका आयुक्त (अध्यक्ष), पोलीस आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व नागपूर सुधार प्रन्यासचे प्रतिनिधी, पोलीस सहआयुक्त, मनपाचे आरोग्य अधिकारी (सरकारद्वारे नामनिर्देशित सदस्य), कौस्तव चॅटर्जी, संदीप मानकर (अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी), आशिष नाईक, देवेंद्र मेहर (निवासी कल्याण संघाचे प्रतिनिधी), सचिन पुनयानी (व्यापारी संघाचे प्रतिनिधी), बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक (अग्रणी बँक प्रतिनिधी), अब्दुल रज्जाक कुरेशी, गोपिचंद आंभोरे, प्रमोद मिश्रा, नेहा ओचानी, रितू मोहबे, मारोतीकुमार पटेल व संदीप गुहे (पथविक्रेता प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात तीन याचिका प्रलंबित आहेत. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने ही अधिसूचना रेकॉर्डवर घेतली.

 

 

 

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका