शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘रोटा व्हायरस’ लसचा नियमित लसीकरणात समावेश : अतिसार रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:33 IST

बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.जिल्हा परिषदेच्या डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स, कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. असीम इनामदार आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले, ‘रोटा व्हायरस’ हा विषाणू मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. ‘रोटा व्हायरस’ संसगार्चा आरंभ सौम्य अतिसाराने होऊन तो पुढे जाऊन गंभीर स्वरुप धारण करु शकतो. तसेच पुरेसा उपचार न मिळाल्यास शरीरांमध्ये पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन प्रसंगी बालकाचा मृत्यू देखील ओढावू शकतो. यासाठी ही लस मुलांना अनुक्रमे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांपर्यंत तीन वेळा तोंडावाटे द्यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.ही लस सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर सौम्य आणि तात्पुरती लक्षणे जसे उलटी, अतिसार, खोकला, सर्दी, चिडचिड इत्यादी लक्षणे दिसू शकतात. कुपोषित मुलांवर त्वरित उपचार न झाल्यास अतिसार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. यासाठी रोटा व्हायरस लसीकरण बालकांमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे, असे कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार म्हणाले.लसीकरणाबाबत माहिती देतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स म्हणाले, भारतामध्ये जी मुले अतिसारामुळे रुग्णालयात भरती होतात, त्यापैकी ४० टक्के मुले रोटा व्हायरस संक्रमणाने ग्रस्त असतात. देशात ७८ हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. त्यापैकी ५९ हजार बालमृत्यू मुलांच्या पहिल्या दोन वर्षामध्ये होतो.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्या हस्ते रोटा व्हायरस या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यशाळेला वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन आणि आभार जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं