शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

गर्भपातासाठी १,६५० कुमारी मातांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:47 IST

उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमागील पाऊणेसहा वर्षांची आकडेवारी : मनपाच्या ‘एमटीपी’ केंद्रातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कुमारी मातांसंदर्भात मनपाकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१२ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत कुमारी मातांची झालेली नोंदणी, यादरम्यान झालेले मृत्यू, मनपाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. माहितीच्या अधिकाराबाबत नागपूर महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये गर्भपातासाठी १ हजार ६५० कुमारी मातांनी नोंदणी केली. सर्वात जास्त ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ या कालावधीत झाली. या कालावधीदरम्यान ४ कुमारी मातांचा मृत्यू झाला. यातील एक कुमारी माता अल्पवयीन होती. या कालावधीत ५६ खासगी ‘एमटीपी’ केंद्रांची नोंदणी झाली. मागील वर्षभरात नोंदणीचा आकडा १४ इतका होता.मनपा दवाखान्यात ९८४ गर्भपातदरम्यान, मनपातर्फे चालविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे एकूण ९८४ गर्भपात झाले. यातील ५९६ गर्भपात पाचपावली सूतिकागृहात झाले.कुमारी मातांची आकडेवारीवर्ष                संख्या२०१२-१३      ३२४२०१३-१४     ४७२२०१४-१५     १८९२०१५-१६     २६०२०१६-१७     २५६एप्रिल ते डिसेंबर २०१७    १४९

टॅग्स :Abortionगर्भपातnagpurनागपूर