लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या कामात असलेल्या २८ वर्षाच्या मजुराला जवळच असलेल्या रोहित्रामधून निघालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी घडली होती. परमेश यादव देवराई (२८) रा. जिजामातानगर, दिघोरी, (नंदनवन)असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी तपासानंतर तब्बल वर्षभरानंतर कळमना पोलिसांनी जे. पी. कंपनीचे सुपरवाईजर शितला प्रसाद पांडे (६५), रा. न्यू कैलासनगर, मानेवाडा रोड व मालक पुरुषोत्तम रोहश जोबी (५२) रा. धरमपेठ या दोघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविला.देवराई हा १ जानेवारी २०१७ रोजी कळमना जे. पी. कंपनीचे सुरक्षा भिंतीच्या कामाकरिता गेला होता. त्याला पांडे व जोबी या दोघांनी भिंतीच्या कामाकरिता बोलाविले होते. त्या ठिकाणी देवराई याला आरोपींनी मशिनद्वारे खड्डा खोदण्यास सांगितले. त्याठिकाणी रोहित्रामधून निघालेली विद्युत तार जमिनीखालून गेली होती. याबाबत आरोपींना माहिती होते. त्यांनी सुरक्षेची जबाबदारी न घेता देवराईला खड्डा खोदण्यास सांगितले. दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान देवराई काम करत असताना त्याच्या मशीनला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्याला मेयो रुग्णालयात भरती केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु याप्रकरणात कळमना पोलिसांनी तपास केला असता यात आरोपी पांडे व जोबी यांनी निष्काळजीपणा केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविला.
‘त्या’ आरोपींविरुद्ध वर्षभरानंतर निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:01 IST
एका कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या कामात असलेल्या २८ वर्षाच्या मजुराला जवळच असलेल्या रोहित्रामधून निघालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी घडली होती. परमेश यादव देवराई (२८) रा. जिजामातानगर, दिघोरी, (नंदनवन)असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी तपासानंतर तब्बल वर्षभरानंतर कळमना पोलिसांनी जे. पी. कंपनीचे सुपरवाईजर शितला प्रसाद पांडे (६५), रा. न्यू कैलासनगर, मानेवाडा रोड व मालक पुरुषोत्तम रोहश जोबी (५२) रा. धरमपेठ या दोघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविला.
‘त्या’ आरोपींविरुद्ध वर्षभरानंतर निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देमजुराच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरण