शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपूरकर वाहतूक नियमांच्या बाबतीत ‘बेपर्वा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 21:36 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांतच ‘हेल्मेट’ न घालणाऱ्या  ४० हजार नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागले तर मद्यपान करून चालविणारे १८ हजाराहून अधिक वाहनचालक ...

ठळक मुद्दे‘हेल्मेट’ न घालणाऱ्या  ४० हजार नागरिकांना दंडदरदिवशी सरासरी १४५ दुचाकीस्वारांवर कारवाईसिग्नल तोडणारे १२ हजारांहून अधिक नागरिक अडकलेकारवाईमध्ये वाढ : ९ महिन्यांतील आकडेवारी

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांतच ‘हेल्मेट’ न घालणाऱ्या  ४० हजार नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागले तर मद्यपान करून चालविणारे १८ हजाराहून अधिक वाहनचालक सापडले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपूर शहरात ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’ची किती प्रकरणे झाली, अतिवेग, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे इत्यादीसंदर्भात किती जणांवर कारवाई झाली यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ‘हेल्मेट’ न घालता दुचाकी चालविणाऱ्या  ४० हजार २ नागरिकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून १ कोटी ३९ लाख ५० हजार ६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सरासरी काढली तर दर दिवशी सुमारे १४५ नागरिकांवर ‘हेल्मेट’ न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.याशिवाय अतिवेगाने वाहने चालविणाºया ११३२, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया ४४९१, ‘सिटबेल्ट’ न लावणाºया ७४७७ तर ‘ट्रीपलसीट’ दुचाकी चालविणाऱ्या  ५९६६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’च्या कारवाईत वाढदारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर वचक रहावा यासाठी नागपूर पोलिसांतर्फे ‘ड्रंकन ड्रायव्हिंग’च्या कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. २०१७ मध्ये पहिल्या ९ महिन्यांतच १८८९० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षभरात कारवाईचा आकडा २७९७१ इतका होता.