शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

साहिल सय्यदचा बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगितीस नकार : हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:44 IST

गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

ठळक मुद्दे ले-आऊटमधील अन्य अवैध बांधकामे पाडण्याचा आदेशही दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. तसेच, बाबा बगदादियानगरमधील इतर अनधिकृत बांधकामेही आठ आठवड्यात पाडण्याचा आणि त्याचा अहवाल सादर करण्याचा महानगरपालिकेला आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. साहिलने मशिदीसाठी आरक्षित भूखंडावर बंगला बांधला आहे. त्याने बंगला बांधताना प्रशासनाची परवानगी घेतली नाही. गुन्हे शाखेने २९ जुलै रोजी मनपाला पत्र लिहून हा बंगला पाडण्याची सूचना केली होती. त्यानुसार मनपाने १० ऑगस्ट रोजी सय्यदच्या नावाने नोटीस जारी करून बंगला पाडण्यासाठी २४ तासाची मुदत दिली होती. त्यावर साहिलच्या वतीने उत्तर सादर करण्यात आले, पण त्या उत्तराने मनपाचे समाधान झाले नाही. परिणामी, बुधवारपासून बंगला पाडण्याला सुरुवात करण्यात आली. संबंधित ले-आऊट अनधिकृत असून ले-आऊटमध्ये २८८ भूखंड आहेत. त्यावर साहिलसह इतर अनेकांनी अवैध बांधकाम केले आहे. त्यावरही आता बुलडोझर चालविला जाईल.मनपाच्या कारवाईविरुद्ध साहिलचे वडील खुर्शीद अली मो. अली सय्यद यांनी याचिका दाखल केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित ले-आऊट अनधिकृत असले तरी ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित होऊ शकते. वादग्रस्त भूखंडावर अवैध बांधकाम करण्यात आले नाही. आवश्यक जागा मोकळी सोडण्यात आली आहे. कारवाई करण्यापूर्वी सुनावणीची संधी देण्यात आली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. बंगल्याचा मालक साहिलविरुद्ध विविध प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले असून तो सध्या कारागृहात आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार तर, मनपातर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर