लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युको बँकेचे ३६ कोटी १८ लाख ९४ हजार ८३२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी)ने मावेन इंडस्ट्रीजला दिला आहे.२००७ ते २०११ या काळात मावेन इंडस्ट्रीजने व्यावसायिक उपयोगाकरिता युको बँकेच्या सीताबर्डी शाखेतून ३७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर मावेन इंडस्ट्रीजने कर्जाची रक्कम वेगळ्या कामाकरिता वापरल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यामुळे बँकेने सीबीआयकडे तक्रार नोंदवली. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर २०१५ मध्ये मावेन इंडस्ट्रीजचे संचालक अशोककुमार व किशोरकुमार राठी आणि बँकेच्या ११ अधिकाऱ्यांविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तो खटला अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, युको बँकेने कर्जाची रक्कम परत मिळविण्यासाठी कर्ज वसुली न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. तसेच, या अर्जाच्या प्रत्युत्तरात मावेन इंडस्ट्रीजने १८१ कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. प्रकरणावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर न्यायाधिकरणने विविध बाबी लक्षात घेता युको बँकेचा अर्ज मंजूर केला तर, मावेन इंडस्ट्रीजचा दावा फेटाळून लावला. युको बँकेतर्फे अॅड. मिलिंद वडोदकर यांनी कामकाज पाहिले.
युको बँकेचे ३६ कोटीचे कर्ज परत करा : 'डीआरटी'चा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:56 IST
युको बँकेचे ३६ कोटी १८ लाख ९४ हजार ८३२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी)ने मावेन इंडस्ट्रीजला दिला आहे.
युको बँकेचे ३६ कोटीचे कर्ज परत करा : 'डीआरटी'चा आदेश
ठळक मुद्देमावेन इंडस्ट्रीजला दणका