शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

जीवाश्म इंधन कमी करून अक्षय ऊर्जेची वाढ हाच सुरक्षित पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:12 IST

आयआयटी जोधपूरचे संचालक अविनाश अग्रवाल : नीरीतर्फे ऊर्जा संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जनात भारताचा वाटा कमी असला, तरी जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी कोळसा आधारित वीज व जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम देशालाही भोगावे लागतील, असा गंभीर इशारा आयआयटी, जोधपूरचे संचालक डॉ. अविनाश अग्रवाल यांनी आज नागपुरात दिला.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर नीरी) च्या वतीने ऊर्जा परिवर्तनावर मंथन करण्यासाठी 'ऊर्जा संवाद' या कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी ट्रिपलएस एनआयबीई, कपूरथलाचे महासंचालक डॉ. जी. श्रीधर, सीएसआयआर-एएमपीआरआय, भोपाळचे संचालक डॉ. थल्लदा भास्कर, नीरीचे संचालक डॉ. एस. व्यंकट मोहन, प्रधान वैज्ञानिक डॉ. नितीन लाभशेटवार, संघटक सचिव डॉ. अवनीश अंशुल, मुख्य वैज्ञानिक डॉ. अंकित गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात डॉ. अविनाश अग्रवाल यांनी 'ई-इंधन स्वीकारण्यातील संधी आणि आव्हाने' यावर बोलताना ऊर्जा आणि जीडीपीचा थेट संबंध असल्याचे नमूद केले. ऊर्जा बचत केली, तर देशाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे ते म्हणाले. भारताचे जीएचजी उत्सर्जन ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, तापमानवाढ १.५ डिग्रीवर नियंत्रित ठेवण्यासाठी अक्षय ऊर्जेची क्षमता वाढविणे, बायोमासने कार्बन कॅप्चर करण्याचे तंत्र विकसित करण्यावर भर दिला. त्यातून भारत ३६.९ गिगावॅट ऊर्जेची बचत करू शकेल. भारताने २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेचे उत्पादन ५०० गिगावॅट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्याचा कोळशाचा वापर प्रतिवर्ष ४०० दशलक्ष टन आहे. हा वापर कमी करण्यासाठी कार्यक्षम कोळसा तंत्रज्ञानाचा विकास आणि हायड्रोजन ऊर्जेचा विकास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जैवइंधनाचे महत्त्व अधोरेखित करीत मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर (डीएमई) इंधनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. आयात होणाऱ्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मिथेनॉल अर्थव्यवस्था महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :nagpurनागपूर