शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वारांगनांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी ‘रेडक्रॉस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:51 IST

वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे.

ठळक मुद्देइंडियन रेडक्रॉस सोसायटीचा सेवाधर्म : सात महिलांचे पुनवर्सन, तर सात जणींना शिक्षणाकडे केले वळते आज जागतिक रेडक्रॉस दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम करीत त्यांना मदतीचा हात देत सन्मानाने जीवन जगण्याचा, आशेचा किरण फुलवणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा गेल्या सहा दशकांपासून सेवाधर्म अविरत सुरू आहे. त्यांच्यामध्ये आरोग्याबाबत जनजागृतीसोबतच सामान्य नागरिकांचे अधिकार मिळावे म्हणून सोसायटीतर्फे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, नुकतेच सात वारांगनाचे पुनवर्सन म्हणजे त्यांची लग्न लावून देण्यात आली तर सात वारांगनाना शिक्षणाकडे वळते करण्यात सोसायटीला यश आले आहे.१९६० मध्ये स्थापन झालेली नागपुरातील ‘इंडियन रेडक्रॉस सोसायटी संस्था’ पूर्वी सदर रोडवर कार्यरत होती. या मार्गाला आजही ‘रेडक्रॉस रोड’ असेही संबोधले जाते. त्यानंतर वर्षे २००० पासून या संस्थेचे कार्य गंगाजमुना या वारांगनांची वस्ती असलेल्या जुन्या मंगळवारीत सुरू झाले. येथील वारांगनांमध्ये एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीचे काम ही संस्था करीत आहे. ‘रेडक्रॉस’ने वारांगनांशी नात्याची वीण घट्ट केली आहे.जगातील सर्व देशांचा सहभाग असलेल्या या संघटनेची सुरुवात मुळात युद्धात जखमी आणि आजारी सैनिकांची देखभाल करण्याच्या उद्देशातून सुरू झाली; परंतु पुढे व्यापक सेवाधर्माचा वसा या संस्थेनं जगभरात पेरला. प्रत्येक शहरात सेवाधर्माचा वेगळा पैलू रेडक्रॉस संस्थेने जोपासला आहे. नागपुरात ही संस्था सध्याच्या स्थितीत अडीच हजार वारांगनांना विविध सोई उपलब्ध करून त्यांना मदतीचा हात देत आहे. त्यांच्यात एचआयव्हीबाबत जनजागृती करणे, निरोधचे वाटप करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत गुप्तरोगाची माहिती देऊन औषधोपचारासाठी मदत करणे, त्यांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्यास मदत करणे, यात राशनकार्ड मिळवून देणे, आधार कार्डसाठी मदत करणे आदी सोई दिल्या जात आहे. वारांगनांच्या आयुष्यातील अनारोग्याचा अंधार दूर करण्यासाठी ‘रेडक्रॉस’ जणू प्रकाशदीप ठरली आहे. या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आहे.

टॅग्स :nagpurनागपूर