शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपुरातील माफसूच्या पदभरतीत गोलमाल असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 21:12 IST

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.

ठळक मुद्देकॉल पाठविला पण मुलाखतच घेतली नाहीवाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरसाठी पदभरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात (माफसू) पुन्हा एकदा पदभरतीमुळे चर्चेत आले आहे. माफसू अंतर्गत वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटरच्या तीन पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची जाहिरातच मुळात त्रुटीपूर्ण असल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे. परंतु एका उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखत न घेताच परत पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या विद्यापीठाअंतर्गत असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा संशयात सापडली आहे.गोरेवाडा येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र (वाईल्ड लाईफ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर) स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात एकूण २० जागाही मंजूर करण्यात आल्या. यापैकी पशु वैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, पशु प्रजनन शास्त्र आणि पशु जैव तंत्रज्ञान या पदासाठी जाहिरात काढण्यात आली. ही तिन्ही पदे पशु व मत्स्य विद्यापीठाशी संबंधित आहेत. वाईल्ड लाईफशी त्यांचा संबंध नाही. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी वन्यजीव विज्ञान किंवा वन्यजीव आरोग्य व व्यवस्थापन या विषयाच्या पदव्युत्तरांची आवश्यकता आहे. परंतु हे विषय जाहिरातीतूनच वगळण्यात आले आहेत. यासंबंधात काही जणांनी तक्रारही केली आहे. डॉ. दत्तात्रय इंगोले हे स्वत: एक उमेदवार आहेत. ते मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या धुळ्याला राहतात. ते माफसूचेच माजी विद्यार्थी असून वाईल्ड लाईफचे तज्ज्ञ आहेत. वन्यजीव सायन्समध्ये ते पीएचडी आहेत. तसेच नेटसुद्धा झालेले आहेत. वाईल्ड लाईफ सेंटरसाठी पदभरती होत आहे. परंतु या विषयातील तज्ज्ञ असूनही अर्ज करता येत नसल्याने त्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप घेतला आणि अर्ज करण्याची विनंती केली. विद्यापीठाने त्यांची विनंती मान्य केली. मुलाखतीसाठीही त्यांना बोलावले. बुधवारी मुलाखत होती. परंतु त्यांची मुलाखतच घेण्यात आली नाही. याबाबत विचारणा केली असता कुणी काहीही बोलायला तयार नव्हते. मुलाखत न घेताच त्यांना परत पाठविण्यात आले. मुलाखत घ्यायचीच नव्हती तर मग कॉल लेटर पाठवलेच का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर