शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणे महाविद्यालयाला भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:26 IST

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन लाखो रुपये लाटणे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला महागात पडणार आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेदेखील महाविद्यालयावर ठपका लावत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यता रद्द करणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन लाखो रुपये लाटणे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला महागात पडणार आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेदेखील महाविद्यालयावर ठपका लावत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची भूमिका घेतली आहे.वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्काहून १० ते १२ हजार रुपये अतिरिक्त रक्कम घेण्यात आली होती, अशा तक्रारी विद्यापीठाकडे आल्या होत्या. वेगवेगळे कारण सांगून ही रक्कम घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना ‘कॉशन मनी’चा निधीदेखील वापस करण्यात आला नव्हता. विद्यार्थी संघटनांनीदेखील हा मुद्दा उचलला होता व विद्यापीठाकडे तक्रार केली होती. त्याआधारे विद्यापीठाने डॉ. श्रीकांत कोमावार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने विद्यापीठाला अहवाल सादर केला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या अहवालावर चर्चा झाली. समितीने महाविद्यालयाविरोधात फौजदारी कारवाईचीदेखील शिफारस केली होती.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन कॉलेजला दोषी ठरविण्यात आले. या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्यात येणार असल्याची भूमिका कुलगुरूंनी घेतली आहे. या सर्व प्रक्रियेला सुमारे एक वर्ष लागणार असले तरी विद्यापीठ कारवाई करेल, डॉ.काणे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.सलीम चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर