शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

माजी मंत्री सतीश चतुर्वेदींवर कारवाईची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:59 IST

काँग्रेस नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही आजवर स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला आहे. या अहवालात त्यांनी चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशहर काँग्रेसने पाठविला अहवाल : तक्रारकर्त्यांचे पुरावेही जोडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही आजवर स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला आहे. या अहवालात त्यांनी चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे २५ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात स्पष्टीकरण मागितले होते. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या लेखी सूचनेवरून ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, चतुर्वेदी यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही. उलट अशी कुठलीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे, उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे, याशिवाय बºयाच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, चतुर्वेदी यांनी पहिल्या दिवसापासून अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा आरोप करीत हा विकास ठाकरे यांचा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकींतर्गत शहर काँग्रेसची निवडणूक रद्द झाली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसला कुणालाही नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद चतुर्वेदी यांनी केला होता. विशेष म्हणजे या नोटीसीनंतरही चतुर्वेदी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी चितार ओळीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत श्रद्धांजलीचा वेगळा कार्यक्रम घेतला होता.चतुर्वेदी यांच्याबाबत ज्यांनी प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या होत्या त्यांनी आपले म्हणजे पुराव्यासह शहर काँग्रेसकडे सादर केले. तर चतुर्वेदी यांनी नोटीसला कुठलेही उत्तर दिले नाही. या आधारावर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या घटनाक्रमाचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला आहे. आता प्रदेश काँग्रेस चतुर्वेदी यांच्याबाबत काय भूमिका घेत याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे चतुर्वेदी यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यांच्याबाबत तक्रारी करणाऱ्यांनी मात्र पुराव्यासह त्यांचे म्हणणे सादर केले आहे. या सर्व वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्यात आला आहे.- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेसचतुर्वेदी दिल्लीत तळ ठोकून काँग्रेसच्या नोटीसनंतर चतुर्वेदी यांच्यावर कारवाई होईल की नाही यावर नागपुरात दावे-प्रतिदावे केले जात आहे. मात्र, चतुर्वेदी हे स्वत: दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांच्या दिल्ली वास्तव्यामुळे पक्षात काहीतरी घडामोडी सुरू असल्याचे संकेत आहेत. चतुर्वेदी कारवाई टाळण्यासाठी दिल्लीत धावपळ करीत असल्याचा मुत्तेमवार समर्थकांचा दावा आहे. तर चतुर्वेदी हे नेत्यांसमोर वास्तविकता मांडण्यासाठी गेले असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatish Chaturvediसतीश चतुर्वेदी