शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

शहरातील पोलीस निवासस्थाने व रस्त्यांसाठी १२ कोटींवर निधीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नाने हा निधी गृह विभागासाठी मिळणार आहे. नागपूर ...

ठळक मुद्दे नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सादर केला होता प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नाने हा निधी गृह विभागासाठी मिळणार आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.हुडको इमारत व लाल इमारत पोलीस लाईन टाकळी येथे सीलिंग प्लास्टर, टाईल्स बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ३ कोटी २४ लाख ४९ हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस लाईन टाकळी येथे ४५० पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम, इमारत दुरुस्ती आदी कामांसाठी २ कोटी १७ लाख ८० हजार रुपये खर्चाला मान्यता मिळाली आहे.पोलिसांसाठी डी, ई, व एफ बराकींचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी ३ कोटी ६४ लाख रुपयांना मान्यता मिळाली आहे. पोलीस मुख्यालय व पोलिसांच्या वस्तीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. गेल्या तीन वर्षाच्या काळात शहर पोलीस विभागाला इमारती व निवासस्थाने बांधकामासाठी १५ वर्षात मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी विद्यमान शासनाने दिला असल्याचे येथे उल्लेखनीय आहे.याशिवाय पोलीस विभागाला जिल्ह्यातील कामासाठी १ कोटी ६२ लक्ष रुपये याआधी देण्यात आला आहे. हा निधी वितरितही करण्यात आला. रामटेक पोलीस चौकीसाठी १२ लक्ष, अमली पदार्थ गोदाम १५ लक्ष, काटोल कॅन्टीन १० लक्ष, नंदनवन पोलीस स्टेशन इमारत ३२ लक्ष, कान्होलीबारा पोलीस चौकी २५ लक्ष, खापा महिला बरॅक १६ लक्ष, सावरगाव पोलीस चौकी ९ लक्ष, केळवद ४ महिला गृह १४ लक्ष, कुही महिला गृह १५ लक्ष, रामटेक महिला गृह १५ लक्ष रुपयांची कामे करण्यात येत आहेत.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसHomeघर