शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भाजपला विदर्भ राज्य बनविण्याची हीच खरी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:13 IST

युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीचे ‘विदर्भ मिशन २०२३’ : सहा महिने श्रुंखलाबद्ध आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिवसेनेची भाजप सोबत असलेली युती आता संपुष्टात आली असून हा पक्ष केंद्र सरकारमधील एनडीएच्या घटक दलामधून बाहेर पडला. शिवसेनेने कायम विदर्भ राज्य निर्मितीला विरोध केला आहे व त्यांच्या विरोधामुळे भाजपनेही विदर्भाच्या जनतेला दिलेले वचन मोडले. मात्र युती तुटल्यामुळे विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वेळ साधून केंद्रातील भाजपा सरकारने संसदेत ठराव मांडून विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली.समितीच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शनिवारी आमदार निवास येथे पार पडली. बैठकीमध्ये पारित झालेल्या ठरावाबाबत अ‍ॅड. वामनराव चटप व राम नेवले यांनी पत्रकारांना माहिती दिली. भाजपसाठी विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची हीच खरी वेळ आहे, असे चटप म्हणाले. अशावेळी राज्यातील संभाव्य सरकारने विरोध केला तर राज्यात अराजक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला. बैठकीत इतरही ठराव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी व तातडीची मदत देण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. विदर्भात विजेचे दर निम्मे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.विदर्भ राज्याच्या निर्मितीसह इतर मागण्यांसाठी येत्या २ डिसेंबरपासून १ मे पर्यंत शृंखलाबद्ध आंदोलन करण्यची घोषणा समितीने केली आहे. २ डिसेंबर रोजी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवाग्राम येथे सामूहिक उपोषण करून भाजपला सद्बुद्धी देण्यासाठी गांधीजींना साकडे घालणार आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला जिल्हा व तालुकास्तरावर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. १५ जानेवारीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये मुख्य अभियंता महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. १५ ला अकोला, १७ ला अमरावती, २० जानेवारीला नागपूर, २२ जानेवारी चंद्रपूर व २४ जानेवारीला गोंदिया येथे आंदोलन होईल. १५ फेब्रुवारी २०२० ला विदर्भातील सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात १ मे रोजी विदर्भ बंदची घोषणा यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला ‘विदर्भ मिशन २०२३’ असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रबिरकुमार चक्रवर्ती, रंजना मामर्डे, अरुण केदार, देविदास लांजेवार, राजेंद्र आगरकर, अनिल तिडके, दिलीप भोयर, निळकंठ यावलकर, गुलाबराव धांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भBJPभाजपाShiv Senaशिवसेना