तयारी पूर्ण, मुहुर्ताची प्रतीक्षा : महावितरणने तैनात केले अभियंते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:25 AM2019-09-07T00:25:25+5:302019-09-07T00:26:14+5:30

महावितरण आता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्याकडे पूर्णपणे घेईल, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. महावितरणने तशी तयारीही सुरू केली आहे. परंतु मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.

Ready complete, wait for Muharta: Engineers posted by Mahavitran | तयारी पूर्ण, मुहुर्ताची प्रतीक्षा : महावितरणने तैनात केले अभियंते 

तयारी पूर्ण, मुहुर्ताची प्रतीक्षा : महावितरणने तैनात केले अभियंते 

Next
ठळक मुद्देएसएनडीएलमध्ये उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण आता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्याकडे पूर्णपणे घेईल, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. महावितरणने तशी तयारीही सुरू केली आहे. परंतु मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे एसएनडीएलच्या कार्यालयांमध्ये उदासीनता दिसून आली. कंपनीचे कर्मचारी केवळ नावासाठी कार्यालयात पोहोचले. कामकाज जवळपास ठप्पच राहिले.
गेल्या १२ ऑगस्ट रोजी एसएनडीएलने पत्र पाठवून हे स्पष्ट केले होते की, ते वितरणाची जबाबदारी सांभाळण्यास असमर्थ आहेत. महावितरणने जबाबदारी स्वीकारावी. यानंतर अनेक बैठका झाल्यानंतर महावितरणने जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण ७ सप्टेंबरपर्यंत कामकाज आपल्या हाती घेईल, असा सूत्रांचा दावा आहे. परंतु शनिवारी अवकाश असल्याने ते शक्य झाले नाही.
आता १० सप्टेंबरपर्यंत महावितरण वितरणाची जबाबदारी आपल्या हाती घेणार असल्याचे सांगितले जाते. यादरम्यान महावितरणने तीन कार्यकारी अभियंत्यांच्या नियुक्तीनंतर १२ पेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांची बदली नागपूरला केली आहे. ते शनिवारी नागपुरात रुजू होणार आहेत. एसएनडीएलचे कर्मचारी कार्यालयात येत आहेत. परंतु कामकाज मात्र ठप्प पडले आहे. ते सातत्याने पीएलआय आणि जुनी थकीत देण्याची मागणी करीत आहेत. दुसरीकडे कंपनीचे व्हेंडर शुक्रवारी पुन्हा संपावर होते. त्यांनी त्यांचे थकीत ५० कोटी रुपये परत मिळावे, या मागणीसाठी रविभवनात निदर्शने केली.
विभागांचे गठण करावे लागेल
फ्रेन्चाईजी येण्यापूर्वी महावितरण महाल, गांधीबाग आणि सिव्हील लाईन्स या विभागाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणाची जबाबदारी पार पाडत होते. यानंतर हे विभाग संपविण्यात आले. आता पुन्हा महावितरण कामकाज सांभाळणार असल्याने त्यांना विभागाचे गठन करावे लागणार आहे.

Web Title: Ready complete, wait for Muharta: Engineers posted by Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.