शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संविधान वाचन बाबासाहेबांचे अभिवादन करण्यासाठीच : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:46 IST

ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.विधानभवनातील सदस्यांच्या फोटोसेशननंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आमच्यासारखा शेतकऱ्यांचा मुलगा त्यांच्यामुळेच विधानसभेत आला. सर्वसामान्य परिवारातून येऊनही जनता जनार्दनाची सेवा करण्याची संधी संविधानामुळे मिळाली. त्यामुळे संविधानाचे वाचन पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी करण्याचा नवा पायंडा घातला. जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा लोकशाहीतून दिली, त्याची आठवण आणि स्मरण करता यावे यासाठी हे वाचन केले.तीन पक्षांचे सरकार असलेली विधानसभा चालविताना विरोधकही प्रचंड आक्रमक आहेत. पहिले दोन दिवस कामकाज होऊ दिले नाही. अध्यक्ष म्हणून काम करताना कसब पणाला लागले का, यावर ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर सुरुवातीला त्रास होतच असतोच. त्याप्रमाणे झाला. आता सर्व व्यवस्थित सुरू असून कामकाजही शांतपणे चालले आहे. प्रश्नोत्तरे व चर्चाही नीटपणे सुरू आहे. सर्वांचेच सहकार्य आपणास मिळत आहे.फोटोसेशन गैरहजेरी, चुकीचा अर्थ काढू नयेविधानसभा अध्यक्ष या नात्याने शुक्रवारी सकाळी फोटोसेशनसाठी नाना पटोले यांनी सर्वांना निमंत्रित केले होते. मात्र विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. ते व्यक्तिगत कामाने गैरहजर असल्याने त्यांच्या नसण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. ते म्हणाले, सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित होते. फोटोसेशनचे डिक्लेरेशन विधानसभेत केले होते. संदेशही विधिमंडळाच्या यंत्रणेमार्फत पाठविला होता. मात्र कुणी वैयक्तिक कामाने गैरहजर असतील तर चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. माझ्यासाठी सत्तापक्ष आणि विपक्ष दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे आपण त्या राजकारणात पडू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर