शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:20 IST

शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले.

ठळक मुद्देकार्यशाळेत नगरसेवकांना प्रभागामध्ये शिबिर आयोजित करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात. जनतेच्या समस्या प्रभावीपणे शासनापुढे मांडण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौरनंदा जिचकार यांनी गुरुवारी केले.नागपूर महापालिका आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती नगसेवकांमार्फत जनतेपर्यत पोहचवण्यात यावी, या उद्देशाने महापौर यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य व वैद्यकीय सेवा समिती उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्य लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.शासनाच्या योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. राज्य शासनाने आरोग्यविषयक योजनांचे एक कवच नागरिकांना दिले आहे. त्याची अंमलबजावणी नीट होणे गरजेचे आहे. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी हे उत्तम माध्यम आहे. याचा विचार करता नगरसेवकांना या योजनांविषयी माहिती असणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या.शहरीकरण व त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी आरोग्य विभागामार्फत के ली जाते. परंतु या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे मत नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.भावना सोनकुसळे यांनी शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य पोषण आहार दिन, महिला आरोग्य समिती, कुटुंब कल्याण या सर्व योजनांसह शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व मनपा दवाखान्यात उपलब्ध सेवांबाबत माहिती दिली. मनपाचा हा पहिलाच उपक्रम असून, नगरसेवकांसाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौरNanda Jichakarनंदा जिचकार