शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवा  : प्रधान सचिव श्याम तागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:53 IST

केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांकासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे आवाहन अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले.

ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या विविध योजनांचा आढावा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांकासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे आवाहन अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीची नागपूर विभागातील जिल्ह्यांची विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त संजय धीवरे, भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी व ज्यू धर्मांचा समावेश होत असल्याचे सांगून श्याम तागडे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी विविध योजना आहेत. या योजना महत्त्वाच्या असून, त्यांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याला अल्पसंख्यांक विकास योजनांचा निधी देण्यात आलेला आहे. मंत्रालयस्तरावर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचा निधी लवकरच जिल्ह्यांना प्राप्त होईल. जे प्रस्ताव अद्यापपर्यंत मंत्रालयात पाठविण्यात आलेले नाहीत, त्यांना तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मंत्रालयात पाठविण्यात यावे, असे आवाहन तागडे यांनी यावेळी केले.अल्पसंख्यांक विभागाच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करण्यासाठी तसेच योजनांचा निधी खर्च करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, लवकरच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी चमूकडून पूर्ण झालेल्या योजनांची पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील धर्मनिहाय, अल्पसंख्यांकनिहाय लोकसंख्या, शिष्यवृत्ती योजना (केंद्रीय व राज्यस्तरीय), डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या ७० टक्के संख्या असलेल्या शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे, वसतिगृह योजना, मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना, शहरी क्षेत्र विकास योजना, मौलाना आझाद शिकवणी व संबंध योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना यासह विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला नागपूर विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर